Web series application form | MT Culture Club

Web series application form

सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतींना मानाचा मुजरा करणारा म.टा.सन्मान २०२३ चा सोहळा लवकरच दिमाखात साजरा होणार आहे. प्रकाशाच्या लखलखाटात आणि टाळ्यांच्या गजरात म.टा सन्मानचे मानचिन्ह मिळवण्यासाठी तयारीला लागा…

पुढील लिंक्सवर क्लिक करून फॉर्म भरा. सोबत स्पर्धेचे नियम बारकाईने वाचायला विसरू नका.

 

 

वेब सिरीजचे नाव

निर्मिती संस्था

निर्माता/निर्माती

२०२२ या वर्षात वेब सिरीज कधी अपलोड करण्यात आली?

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म

पूर्ण पत्ता

संपर्क व्यक्ती

टेलिफोन

मोबाईल

ई-मेल

वेब सिरीजचे नाव

वेब सिरीज तपशील

अभिनेता

अभिनेत्री

पटकथा

संवाद

दिग्दर्शक

पात्रपरिचय
(उदा. वरुण, अर्ज)

प्रसारण दिनांक

प्रसारण लिंक

ओटीटी (उदा. Netflix, Zee5, Amazon Prime)

आपल्या शंका/सूचना

मटा सन्मान २०२३ स्पर्धेसाठीचे सर्व नियम व अटी मी वाचल्या आहेत आणि त्या मला मान्य आहेत.

Last submission date will be 14th Jan 2023

म. टा. सन्मान २०२३
(मराठी चित्रपट, नाटक, मालिका, वेब सिरीज)
सर्वसाधारण प्रवेश नियम

पात्रता
अ) १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रदर्शित झालेले आणि एका चित्रपटगृहात किमान एक आठवडा दाखवले गेलेल्या नव्या मराठी चित्रपटांची यादी वाचक मतदानासाठी संकेतस्थळावर टाकण्यात येईल. वाचकांच्या तेथील कौलानुसार पहिल्या पसंतीचे २५ चित्रपट अंतिम फेरीसाठी निवडण्यात येतील. त्यातूनच सर्व मानांकने काढली जातील. इतर कोणत्याही मार्गाने प्रवेशिका/मानांकने घेतली जाणार नाहीत.

ब) १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात प्रदर्शित झालेली नवी व पुनरुज्जीवित मराठी नाटके व्यावसायिक/प्रायोगिक नाटकासाठीच्या स्पर्धेसाठी पात्र असतील. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत या नाटकांचे किमान पाच प्रयोग झालेले असणे आवश्यक आहे. २०२१ मध्ये लॉकडाऊन अंशतः खुला झाल्यानंतर ५० टकके प्रेक्षकांच्या उपस्थितीत नाटकांचे प्रयोग सुरू झाले. तेव्हा अशा कठीण काळात रंगमंचावर येण्याचे धाडस काही नवीन नाटकांनी दाखवले. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२१ पासून ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात रंगभूमीवर आलेल्या नवीन नाटकांना यंदा मटा सन्मान व्यावसायिक नाटक विभाग स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. परंतु, हा अपवाद केवळ यंदाच्या वर्षापुरताच आहे याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी

 

ब) १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या वेब सिरीज या स्पर्धेसाठी पात्र असतील.

पुरस्कार

चार विभागांसाठी खालीलप्रमाणे ‘म. टा. सन्मान २०२०’ पुरस्कार देण्यात येतील.

अ) नाटक
व्यावसायिक नाटक
१) सर्वोत्कृष्ट नाटक, २) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३) सर्वोत्कृष्ट लेखक, ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता, ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ६) सर्वोत्कृष्ट नेपथ्य, ७) सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, ८) सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता / अभिनेत्री, ९) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
प्रायोगिक नाटक

१) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक, २) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखक, ३) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक, ४) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक अभिनेता ५) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक अभिनेत्री ६) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक पार्श्वसंगीत ७) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नेपथ्यकार ८) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक प्रकाश योजना

ब) टीव्ही मालिका
१) सर्वोत्कृष्ट मालिका, २) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३) सर्वोत्कृष्ट पटकथा, ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता, ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ६) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, ७) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, ८) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, ९) सर्वोत्कृष्ट संकलन, १०) सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत.

क) चित्रपट
१) सर्वोत्कृष्ट चित्रपट, २) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३) सर्वोत्कृष्ट अभिनेता, ४) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ५) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता ६) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, ७) सर्वोत्कृष्ट पटकथा ८) सर्वोत्कृष्ट संवाद ९) सर्वोत्कृष्ट गीत १०) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ११) सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, १२) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, १३) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, १४) सर्वोत्कृष्ट संकलन १५) सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक व्यावसायिक/प्रायोगिक नाटक आणि मालिकांच्या प्रवेशिका स्वीकारण्याचा शेवटचा दिवस – सोमवार १५ जानेवारी २०२०
ड) वेब सिरीज

१) सर्वोत्कृष्ट वेब सिरीज २) सर्वोत्कृष्ट लेखन ३) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

म. टा. सन्मान २०२३, प्रवेश नियम

परीक्षक व निकाल : स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरीज ) स्वतंत्र परीक्षक मंडळ नेमण्यात येईल. परीक्षक मंडळाने दिलेल्या निर्णयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यवस्थापनाने शिक्कामोर्तब केल्यावर अंतिम निकालपत्र तयार होईल. अंतिम निकाल ‘म. टा. सन्मान २०२३’ सोहळ्यात जाहीर केला जाईल. हा निकाल सर्वांना बंधनकारक राहील.
मराठी चित्रपट विभाग

१) मानांकन मिळालेल्या चित्रपटांच्या परीक्षकांकरता चित्रपट पेन ड्राइव्ह अथवा लिंकवर पाहण्याची व्यवस्था करावी लागेल.

२) चित्रपट १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रदर्शित होऊन त्याच कालावधीत किमान एका चित्रपटगृहामध्ये एक आठवडा दाखवण्यात आलेला असावा.

३) १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रदर्शित झालेले सर्व मराठी चित्रपट ‘म. टा. सन्मान २०१९’ मतदानासाठी (वाचक कौल) ग्राह्य धरण्यात येतील
मराठी नाटक विभाग (व्यावसायिक आणि प्रायोगिक)

१) नाट्यप्रयोग : स्पर्धेत सहभागी झालेली नाटके (व्यावसायिक/प्रायोगिक) परीक्षकांना पाहता यावीत, म्हणून ५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत संबंधित नाटकाचा प्रयोग मुंबई परिसरातच लावण्याची काळजी निर्मात्यांनी घ्यावी. तसेच मुंबई परिसरात निश्चित झालेल्या प्रयोगांची तारीख, वेळ आणि ठिकाणे यांची यादी प्रवेशिकेसोबत जोडावी. याखेरीज जे प्रयोग नंतर (परंतु ५ फेब्रुवारीच्या आधी) ठरतील त्यांची माहिती वेळोवेळी संबंधितांना आणि matasanman@gmail.com वर द्यावी.

२) कागदपत्रे : प्रवेशिकेसोबत नाटक निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे. नाटक व्यावसायिक विभागात आहे की प्रायोगिक विभागात हे त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावरून ठरवण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. तसेच प्रायोगिक नाटकांच्या प्रवेशिकेसोबत किमान पाच प्रयोग झाल्याचे पुरावे (वृत्तपत्रपातील जाहिरात, थिएटर पावती वा अन्य काही असल्यास) जोडणे बंधनकारक आहे. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

३) प्रवेशिका : नाट्यनिर्मात्यांने अथवा निर्मिती संस्थेने भरलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. आवश्यक ती कागदपत्रेही स्कॅन करून प्रवेशिकेसोबतत जोडणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे : व्यावसायिक नाट्यस्पर्धा आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकासाठी किमान तीन नाटके स्पर्धेत असायला हवीत. तसे नसल्यास पुरस्कार देणे किंवा न दे