TV Serial application form | MT Culture Club

TV Serial application form

टीव्ही मालिका या विभागांमध्ये १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत निर्विवाद कर्तृत्त्व गाजवणा-या प्रतिभावंतांनो सिद्ध व्हा…

सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतींना मानाचा मुजरा करणारा म.टा.सन्मान २०२४ चा सोहळा लवकरच दिमाखात साजरा होणार आहे. प्रकाशाच्या लखलखाटात आणि टाळ्यांच्या गजरात म.टा सन्मानचे मानचिन्ह मिळवण्यासाठी तयारीला लागा…

पुढील लिंक्सवर क्लिक करून फॉर्म भरा. सोबत स्पर्धेचे नियम बारकाईने वाचायला विसरू नका.

मालिकेचे नाव

निर्मिती संस्था

निर्माता/निर्माती

२०२३ या वर्षात मालिका कधी दाखवण्यात आली त्याचा काळ

वाहिनी

२०२३ या वर्षात दाखवण्यात आलेल्या भागांची संख्या

पूर्ण पत्ता

संपर्क व्यक्ती

टेलिफोन

मोबाईल

ई-मेल

मालिकेचा तपशील

मालिकेचे नाव

अभिनेता

अभिनेत्री

सहाय्यक अभिनेता

सहाय्यक अभिनेत्री

पटकथा लेखक

दिग्दर्शक

छायाचित्रण

संकलन

शीर्षकगीत

पात्रपरिचय
(उदा. वरुण, अर्जुन)

आपल्या शंका/सूचना

मटा सन्मान २०२४ स्पर्धेसाठीचे सर्व नियम व अटी मी वाचल्या आहेत आणि त्या मला मान्य आहेत.

 

म. टा. सन्मान २०२४
(मराठी चित्रपट, व्यावसायिक नाटक, मालिका, वेब सिरीज)
सर्वसाधारण प्रवेश नियम

पात्रता
अ) १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रथमच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी वाचक मतदानासाठी संकेतस्थळावर टाकण्यात येईल. वाचकांच्या तेथील कौलानुसार पहिल्या पसंतीचे २५ चित्रपट अंतिम फेरीसाठी निवडण्यात येतील. त्यातूनच सर्व मानांकने काढली जातील. इतर कोणत्याही मार्गाने प्रवेशिका/मानांकने घेतली जाणार नाहीत.

ब) नाटकाचे पाच प्रयोग झाल्याच्या पावत्यांचे फोटो colourmt@gmail.com या इमेलवर पाठवता येतील. तुमच्या नाटकाचे नाव इमेल सब्जेक्टमध्ये टाइप करून, इमेलबरोबर या पावत्या अटॅच करून तो वर दिलेल्या इमेल आयडीवर पाठवावा.

स) १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात प्रदर्शित झालेली नवी व पुनरुज्जीवित मराठी नाटके व्यावसायिक नाटकासाठीच्या स्पर्धेसाठी पात्र असतील. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत या नाटकांचे किमान पाच प्रयोग झालेले असणे आवश्यक आहे. 

विशेष सूचना – प्रायोगिक नाटकांसाठीची स्पर्धा यावर्षी स्वतंत्रपणे घेण्यात येणार असून त्या संबंधीचा तपशील नंतर जाहीर केला जाणार आहे.

क) १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात सुरू झालेल्या नव्या मराठी मालिकांपैकी ज्या टीव्ही मालिकांचे किमान सहा भाग वर उल्लेखिलेल्या कालावधीत कोणत्याही वाहिनीवर दाखवले गेले आहेत, अशा मालिका प्रवेशासाठी पात्र असतील.

ड) १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या वेब सिरीज या स्पर्धेसाठी पात्र असतील.

पुरस्कार
चार विभागांसाठी खालीलप्रमाणे ‘म. टा. सन्मान २०२४’ पुरस्कार देण्यात येतील.

चित्रपट
१) सर्वोत्कृष्ट चित्रपट, २) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३) सर्वोत्कृष्ट अभिनेता, ४) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ५) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता ६) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, ७) सर्वोत्कृष्ट पटकथा ८) सर्वोत्कृष्ट संवाद ९) सर्वोत्कृष्ट गीत १०) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ११) सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, १२) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, १३) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, १४) सर्वोत्कृष्ट संकलन १५) सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक

ब) नाटक
व्यावसायिक नाटक

१) सर्वोत्कृष्ट नाटक, २) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३) सर्वोत्कृष्ट लेखक, ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता, ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ६) सर्वोत्कृष्ट नेपथ्य, ७) सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, ८) सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता / अभिनेत्री, ९) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, १०) सर्वोत्कृष्ट वेशभूषा

क) टीव्ही मालिका
१) सर्वोत्कृष्ट मालिका, २) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३) सर्वोत्कृष्ट पटकथा, ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता, ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ६) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, ७) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, ८) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, ९) सर्वोत्कृष्ट संकलन, १०) सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत.

ड) वेब सिरीज
१) सर्वोत्कृष्ट वेब सिरीज २) सर्वोत्कृष्ट लेखन ३) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

व्यावसायिक नाटक आणि मालिकांच्या प्रवेशिका स्वीकारण्याचा शेवटचा दिवस २०  जानेवारी  २०२४

म. टा. सन्मान २०२४, प्रवेश नियम
परीक्षक व निकाल : स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरीज) स्वतंत्र परीक्षक मंडळ नेमण्यात येईल. परीक्षक मंडळाने दिलेल्या निर्णयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यवस्थापनाने शिक्कामोर्तब केल्यावर अंतिम निकालपत्र तयार होईल. अंतिम निकाल ‘म. टा. सन्मान २०२४’ सोहळ्यात जाहीर केला जाईल. हा निकाल सर्वांना बंधनकारक राहील.

मराठी चित्रपट विभाग
१) मानांकन मिळालेल्या चित्रपटांच्या परीक्षकांकरता चित्रपट पेन ड्राइव्ह अथवा लिंकवर पाहण्याची व्यवस्था संबंधित निर्मिती संस्थेला करावी लागेल.

२) चित्रपट १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रदर्शित होऊन त्याच कालावधीत किमान एका चित्रपटगृहामध्ये सलग एक आठवडा दाखवण्यात आलेला असावा.

३) १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर  २०२३ या कालावधीत प्रदर्शित झालेले सर्व मराठी चित्रपट ‘म. टा. सन्मान २०२४  मतदानासाठी (वाचक कौल) ग्राह्य धरण्यात येतील.

मराठी नाटक विभाग (व्यावसायिक)
१) नाट्यप्रयोग : स्पर्धेत सहभागी झालेली नाटके परीक्षकांना पाहता यावीत, म्हणून येत्या  १६ फेब्रुवारी  पर्यंत संबंधित नाटकाचा प्रयोग मुंबई परिसरातच लावण्याची व्यवस्था निर्मात्यांनी करावी. तसेच मुंबई परिसरात निश्चित झालेल्या प्रयोगांची तारीख, वेळ आणि ठिकाणे यांची यादी प्रवेशिकेसोबत जोडावी. याखेरीज जे प्रयोग नंतर (परंतु  १६ फेब्रुवारी आधी) ठरतील त्यांची माहिती वेळोवेळी संबंधितांना आणि matasanman@gmail.com वर द्यावी.

२) कागदपत्रे : प्रवेशिकेसोबत नाटक निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे. नाटक व्यावसायिक विभागात आहे  हे त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावरून ठरवण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

३) प्रवेशिका : नाट्यनिर्मात्यांने अथवा निर्मिती संस्थेने भरलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. आवश्यक ती कागदपत्रेही स्कॅन करून प्रवेशिकेसोबतत जोडणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे : व्यावसायिक नाट्यस्पर्धा  किमान तीन नाटके स्पर्धेत असायला हवीत. तसे नसल्यास पुरस्कार देणे किंवा न देण्याचा निर्णय आयोजक घेतील.