म. टा. सन्मान २०२६
(मराठी चित्रपट, व्यावसायिक नाटक, मालिका, वेब सिरीज) सर्वसाधारण प्रवेश नियम
पात्रता
चित्रपट विभाग
- १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रदर्शित झालेले सर्व मराठी चित्रपट ‘मटा सन्मान’च्या प्राथमिक फेरीत सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
- या कालावधीत प्रदर्शित झालेल्यांपैकी ज्यांची माहिती उपलब्ध होईल असे सर्व मराठी चित्रपट ‘म. टा. सन्मान २०२६’ मतदानासाठी (वाचक कौल) ग्राह्य धरण्यात येतील.
- या सर्व चित्रपटांची यादी मटा सन्मानच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल, त्यातून वाचकांना त्यांच्या आवडत्या चित्रपटासाठी ‘कौल’ देण्याचे आवाहन महाराष्ट्र टाइम्समधून करण्यात येईल.
- ज्या चित्रपटांना सर्वाधिक पसंती मिळेल असे निवडक चित्रपट अंतिम फेरीसाठी निवडले जातील.
- अंतिम फेरीत दाखल झालेल्या सिनेमांच्या निर्मात्यांशी/दिग्दर्शकाशी ‘मटा प्रतिनिधी’ संपर्क साधेल.
- अंतिम फेरीत दाखल झालेले चित्रपट परीक्षक मंडळाला दाखवले जातील. त्यातूनच सर्व विभागांसाठीचे पुरस्कार निश्चित परीक्षकांकडून निश्चित करण्यात येतील.
- अंतीम फेरीसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध होईल.
- या चित्रपटांची ऑनलाइन पासवर्ड प्रोटेक्टड लिंक 'महाराष्ट्र टाइम्स' कडे पाठविण्याविषयी संबंधितांना सांगितले जाईल (जी लिंक पुढे किमान दोन महिने लाइव्ह राहील अशी असावी).
- काही तांत्रिक कारणाने लिंक ओपन होऊ शकली नाही तर संबंधित चित्रपट समाविष्ट असलेले चार पेनड्राईव्ह महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात संबंधितांना पोहोचवावे लागतील.
- चित्रपट १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रदर्शित होऊन त्याच कालावधीत एका चित्रपटगृहामध्ये सलग किमान एक आठवडा दाखवण्यात आलेला असावा.
- याच कालावधीत थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट देखील स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र असतील.
- निर्मात्यांनी निवड झालेल्या चित्रपटातील पात्र परिचय, कलाकारांची यादी, श्रेय सूची (कास्ट अँड क्रेडिट लिस्ट), गाणी (गाण्याचे बोल) या बाबतची सविस्तर माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे देणे आवश्यक आहे.
- वाचकांच्या मतांची आकडेवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ व्यतिरिक्त अन्य कोणालाही आणि कोणत्याही कारणासाठी उपलब्ध करुन दिली जाणार नाही.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. त्या बाबतीत अन्य कोणाशीही चर्चा करण्यात येणार नाही.
नाटक विभाग (व्यावसायिक)
-
नाट्यप्रयोग:
१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रंगभूमीवर आलेली सर्व नवीन व्यावसायिक नाटके स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या नाटकांचे १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत किमान ५ प्रयोग झालेले असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी झालेली नाटके परीक्षकांना पाहता यावीत, म्हणून १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित नाटकाचे प्रयोग मुंबई, ठाणे परिसरातच लावण्याची व्यवस्था निर्मात्यांनी करणे आवश्यक आहे. तसेच प्रयोगांच्या तारखांची माहिती वेळोवेळी संबंधित नाट्य पुरस्कार समन्वयकांना आणि matasanman@gmail.com वर द्यावी लागले.
-
कागदपत्रे:
नाट्य निर्मात्यांनी प्रवेशिकेसोबत सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र जोडणे अत्यावश्यक आहे. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार अथवा इमेल व्यवहार केला जाणार नाही.
-
प्रवेशिका:
नाट्यनिर्मात्याने अथवा निर्मिती संस्थेने भरलेल्या प्रवेशिकाच केवळ स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. आवश्यक ती कागदपत्रेही स्कॅन करून प्रवेशिकेसोबतच जोडणे आवश्यक आहे.
व्यावसायिक नाटकाच्या प्रवेशिका स्वीकारण्याचा शेवटचा दिवस: १७ जानेवारी २०२६
टीव्ही मालिका विभाग
- १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात ज्या मराठी टीव्ही मालिकांचा पहिला भाग प्रसारित झाला त्या सर्व मालिका स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील.
- टीव्ही मालिका निर्मात्यांनी कोणतेही पाच भाग (इपिसोड्स) चार पेनड्राईव्हमध्ये किंवा ओपन लिंकद्वारे परीक्षणासाठी द्यावेत.
- लिंक ३१ मार्च २०२६ पर्यंत सक्रिय असणे आवश्यक आहे.
- NOC (ना हरकत प्रमाणपत्र) प्रवेशिकेसोबत जोडणे बंधनकारक आहे.
- नियमात न बसणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील.
मालिकांच्या प्रवेशिका स्वीकारण्याचा शेवटचा दिवस: १७ जानेवारी २०२६
वेब सीरिज
- १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सीरिज स्पर्धेसाठी पात्र असतील.
- पाच निवडक भाग चार पेनड्राईव्हमध्ये किंवा ओपन लिंकद्वारे सादर करणे आवश्यक आहे.
- NOC प्रवेशिकेसोबत जोडणे बंधनकारक आहे.
- नियमात न बसणाऱ्या प्रवेशिका बाद ठरवल्या जातील.
वेब सीरीजच्या प्रवेशिका स्वीकारण्याचा शेवटचा दिवस: १७ जानेवारी २०२६
पुरस्कार
चार विभागांसाठी खालीलप्रमाणे ‘म. टा. सन्मान २०२६’ पुरस्कार देण्यात येतील.
चित्रपट
- सर्वोत्कृष्ट चित्रपट
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट पटकथा
- सर्वोत्कृष्ट संवाद
- सर्वोत्कृष्ट गीत
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
- सर्वोत्कृष्ट संकलन
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
नाटक
- सर्वोत्कृष्ट नाटक
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट लेखक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य
- सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता / अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा
टीव्ही मालिका
- सर्वोत्कृष्ट मालिका
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट पटकथा
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
- सर्वोत्कृष्ट संकलन
- सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत
वेब सिरीज
- सर्वोत्कृष्ट वेब सिरीज
- सर्वोत्कृष्ट लेखन
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
(परीक्षकांच्या शिफारशींनुसार अथवा मटा सन्मानच्या आयोजकांच्या सोयीनुसार पुरस्कारांमध्ये एखादा विभाग वाढवण्याचा अथवा कमी करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात येत आहे)