
ADITYA MUNDANKAR
अजाणत्या वयातच वडिलांचे हरपलेले छत्र... आईने शिवणकाम करून तेरा वर्षे एकटीने कुटुंबाचा ओढलेला गा डा... बहिणीने नोकरी लागताच सांभाळलेली सर्व जबाबदारी... अशा परिस्थितीशी दोन हात करून आदित्य सु भाष मुंडणकरने दहावीत ९७.२० टक्के गुण मिळवले. उच्च शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्य़ाचे स्वप्न त्याने उराशी बाळ गले आहे. त्याच्या या स्वप्नांना उभारी देण्याकरिता गरज आहे, ती भक्कम दातृत्वाची.
Percentage: 97.20 %
Account Details
KANCHAN KADGI
बिकट परिस्थितीचे रडगाणे न गाता जिद्दीने अभ्यास करून कांचन काडगीने दहावीत ९७.४० टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे कांचनने एकही क्लास न लावता हे यश मिळवले. ‘माझ्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, इतर सर्व विषयांचे शिक्षक आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे,’ असे कांचन आवर्जून सांगते. कांचनच् या स्वप्नपूर्तीसाठी आता आवश्यक आहे तुमच्या आर्थिक पाठबळाची.
Percentage: 97.40 %
Account Details
RUTUJA AMALE
दहा बाय दहाची खोली... कुटुंबाची सहा गुंठे जमीन... आदिवासी भाग असल्याने इतर सुविधांची वानवा...कुटुं बात चार जण आणि महिन्याचे उत्पन्न जेमतेम पाच हजार रुपये... अशा परिस्थितीवर मात करून जुन्नर तालुक् यातील बोतार्डे (आमलेवाडी) येथे राहणाऱ्या ऋतुजा प्रकाश आमलेने दहावीत ९९.६० टक्के गुण मिळवले आहेत. तिला डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची आहे.