Pune Archives | MT Culture Club

pune

OMKAR DALVI

घरची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट... आई- वडील काबाडकष्ट करून घर चालवतात... मात्र, ओंकार संतोष दळवी या विद्यार्थ्याची शिकायची जिद्द अशी, की या सर्व परिस्थितीला सामोरे जात त्याने स्वयंअध्ययनाच्या जोरावर दहावीला ९२.४० टक्के मिळवले. शाळेशेजा री असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांना पाहून ओंकारनेही डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी हवी आ हे दातृत्वाची भक्कम साथ.

Percentage: 92.40 %

SAMRUDDHI KAMBLE

तीनचाकी जेवढी चालेल, तितके तिचे जगणे अधिकाधिक सुखकर होत जाते... ही तीनचाकी, म्हणजेच रिक्षा घेऊ नच समृद्धी गणेश कांबळेचे वडील कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीत आहेत. याची पुरेपूर जाणीव ठेवून स्व- अभ्यासातून समृद्धीने यशाची समृद्धी गाठली. या गुणी विद्यार्थिनीने शाळेतल्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्व- अध्ययन करून ९२.६० टक्के गुण मिळवले आहेत. तिला आता हवी आहे दातृत्वाची साथ.

Percentage: 92.60 %

NEHA DEVMUNDE

नेहा देवमुंडेचे आई - वडील बारा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आले. नेहाला दोन बहिणी आणि एक भाऊ. आई- वडिलांनी मोलमजुरी करून मुलांना वाढवले. थोरल्या मुलीला केवळ बारावीपर्यंत शिकवता आले. आपल्या घरा तील ही परिस्थिती बदलण्याच्या जिद्दीने तिने दहावीला भरपूर अभ्यास करून ९३ टक्के गुण मिळवले. ती आता बँकेमध्ये मोठ्या अधिकारपदाचे स्वप्न पाहते आहे. तिला गरज आहे दानशूर हातांची.

Percentage: 93 %

ESHA DARVATKAR

भाड्याच्या दोन खोल्यांत पाच जणांच्या कुटुंबाचा गाडा... त्यातच तीन भावंडांचा एकाच वेळी अभ्यास... दुपार नंतर वडिलांच्या वडापावच्या हातगाडीसाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी सर्वांकडून तजवीज... अशा हलाखीच्या जीवनचक्रात ईशा दारवटकरने चिकाटीने अभ्यास करून कोणताही क्लास न लावता दहावीच्या परीक्षेत ९३.२ ० टक्के गुण मिळवले. तिच्या पुढच्या प्रवासासाठी तिला हवे आहे दातृत्वाचे बळ.

Percentage: 93.20 %

GAYATRI JAMBHALE

वडिलांचे छत्र हरपलेले... कंपनीत हाउसकीपिंगचे काम करून घर चालविणारी आई... जेमतेम दहा बाय आठच् या खोलीमध्ये आई, मावशी, आजी व छोटा भाऊ असे कुटुंब राहते... अभ्यासाला स्वतंत्र जागाही नाही... अशा स र्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गायत्री जांभळेने दहावीला ९३.४० टक्के गुण मिळवले... स्पर्धा परीक्षा देऊ न जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी हवे आहे दातृत्वाचे बळ.

Percentage: 93.40 %

PRANAV KOLEKAR

भाजीविक्रीची गाडी लावण्यासाठी भल्या पहाटेपासून कामाला जुंपून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या आई- वडिलांच्या कष्टाचे चीज करून प्रणव कोळेकरने दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण मिळविले आहेत. न्यू इंग्लि श स्कूल, रमणबाग प्रशालेचा विद्यार्थी असलेल्या प्रणवला वास्तुविशारद (आर्किटेक्ट) व्हायचे असून, या ध्येयपूर्त तेसाठी त्याला हवे आहे समाजातील दात्यांचे पाठबळ...

Percentage: 93.60 %

GOMATI SAHU

भाड्याच्या लहानशा खोलीत राहणारे कुटुंब... आई- वडील दोघेही बिगारी कामगार... आईला दम्याचा आजार... घरात येणाऱ्या मोजक्या पैशांवर घर कसेबसे चाल ते... या परिस्थितीत महापालिका शाळेतील गोमती साहूने दहावीला जिद्दीने अभ्यास करून ९४.२० टक्के गुण मि ळवले. कधी पहाटे लवकर उठून, तर कधी रात्री जागून अभ्यास करून गोमतीने हे यश संपादन केले आहे. उच्च शि क्षणाच्या पुढील प्रवासासाठी तिला हवी आहे दातृत्वाची साथ.

Percentage: 94.20 %

LATA TOLE

गेल्या वर्षी आंबिल ओढ्याला पूर आला, तेव्हा तिचे अर्ध्याहून जास्त घर पाण्यात होते. पाणी ओसरून पुन्हा घरा त राहायला जाईपर्यंत एक महिना गेला. ऐन दहावीच्या वर्षात महिनाभर एका शाळेत वास्तव्य करायची वेळ तिच्यावर आली. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या आजीचे निधन झाले, तरी तिने जिद्द सोडली नाही आणि दहा वीच्या परीक्षेत ९४.४० टक्के मिळवले. लता संतोष टोले या विद्यार्थिनीची ही कहाणी. तिच्या या संघर्षाला हवी आहे दातृत्वाची साथ.

Percentage: 94.40 %

NIKITA LANGOTE

जेमतेम दहा बाय दहाची खोली... महिन्याचा खर्च कसा भागवायचा, अशी भ्रांत... मात्र, सर्वोत्तम गुण मिळाले, तरच चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, याची जाणीव असलेल्या निकिता लंगोटेने बिकट परिस्थितीवर मात क रून वर्षभर भरपूर अभ्यास केला आणि दहावीला ९४.४० टक्के गुण मिळवले. निकिताच्या स्वप्नांना बळ देण्यासा ठी गरज आहे, समाजाच्या दातृत्वाची. ‘मला चार्टर्ड अकाउंटंट होऊन कुटुंबातील संकटे दूर करायची आहेत,’ असे निकिता सांगते.

Percentage: 94.40 %

PRAGATI JAKATE

लहान दोन खोल्यांच्या घरात राहणारे पाच माणसांचे कुटुंब... परिस्थिती बेताचीच... कोणताही क्लास नाही... अभ्यासाची आवड आणि उच्च शिक्षणाचा ध्यास या जोरावर महापालिका शाळेतील विद्यार्थिनी प्रगती जकातेने दहावीला ९४.४० टक्के गुण मिळविले आहेत. प्रसंगी रात्री उशिरा जागून अभ्यास करून तिने हे यश संपादन केले. तिच्या या प्रयत्नांना आता हवी आहे दानशूरांची साथ.

Percentage: 94.40 %

SONALI ROKADE

पहाटे पाच वाजता उठून अभ्यास, नंतर सकाळी ८ ते १ शाळा आणि शाळेनंतर २ ते ७ क्लास असे तिचे वेळापत्र क होते... परिस्थितीमुळे क्लासची फीदेखील ती देऊ शकली नाही. भरपूर अभ्यास आणि उपजत हुशारी या जोरा वर सोनाली नीलेश रोकडेने दहावीत ९५.८० टक्के गुण मिळवले. आता तिचे उच्च शिक्षण सुकर व्हावे, यासाठी ह वी आहे दातृत्वाची साथ...

Percentage: 95.80 %

ANKITA KAKADE

घरची बेताची आर्थिक स्थिती... त्यातच वडिलांचे झालेले आकस्मिक निधन... दहावीच्या परीक्षेचे शुल्क भरण्या साठीही पैसे नाहीत, अशी आलेली वेळ... अशा संकटांना सामोरे जाऊन अंकिता संजय काकडे या विद्यार्थिनीने द हावीत ९७ टक्के गुण मिळवले. अतिशय सुंदर हस्ताक्षर असलेल्या अंकिताला सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचे आहे. तिच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी हवी आहे दातृत्वाची साथ.

Percentage: 97 %