
PRATIK BHARAT PAGAR
जीवघेण्या आजारातून सावरताना मुलांसाठी पुन्हा उभे राहणारे रिक्षाचालक वडिल अन् घरकामाव्दारे कुटूंबास हा तभारलावणाऱ्या आईसाठी प्रतिक हा विद्यार्थी खऱ्या अर्थाने यशाचे अन् गुणांच्या समुच्चयाचे प्रतिक बनला आहे. प्रतिक सिडकोतील जनता विद्यालयाचा विद्यार्थी आहे. प्रतिकचे वडिल भरत पगारे हे दोन दशकांपासूननाशिकमध्ये मालेगांव तालुक्यातून स्थायिक झाले आहेत. लॉक डाऊन अगोदर कसेबसे सात ते आठ हजारांचे उत्पन्न त्यांना मिळायचे. आता ते ही बंद झाले आहे. दिवसाकाठी त्यांची कधी अवघ्या ५० ते १०० रूपयांची कमाई होते. शाळेतील नाटकांमध्ये अभिनय करण्यापासून तर नाटकाच्या लिखाणातही प्रतिक तरबेज आहे. बारावीनंतर ‘ए फटीटीआय’ (फिल्म ॲण्ड टीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) सारख्या नामांकीत संस्थेमधूनपरफॉर्मिंग आर्ट्समध्ये शिक्षण घेत अभिनयात करिअर करण्याचे स्वप्न आहे. यासोबतीलाच करिअरचा ‘बी प्लॅन’ म्हणूनतो प्रशासकीय से वांच्या परीक्षांचीही तयारी करणार आहे.
Percentage: 96.40 %
Account Details
RUTUJA DNYNESHWAR PATIL
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करण्याबरोबरच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न. सुरुवातीला कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करून चांगला जॉब सुरू करायचा आणि त्याचबरोबर ‘आयएएस’ चाही अभ्यास सुरू करून अधिकारी होण्याचे स्वप्न. पितृछत्र हरपलेली ऋतुजा ही काका काकूंच्या आश्रयाने राहते.. जाजू विद्यालयात सेमी इंग्रजीमध्ये शिकली. सकाळी शाळेचा क्लास, त्यानंतर दुपारची शाळा व रात्री बाल्कनीत जागून अभ्यास. ९५ टक्के मिळविण्याकडे कल होता. तिला एक भाऊ, आई आहे.
Percentage: 96.20 %
Account Details
AARYA VIJAY VISPUTE
वृत्तपत्र विक्रेत्याची गुणी मुलगी असलेल्या आर्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर दहावीत ९१.६० टक्के मिळविले. तिला ‘इस्त्रो’त करिअर करायचे आहे. आर्या नाशिकरोडच्या र. ज. बिटको हायस्कूलची विद्यार्थीनी. दहावीपर्यंत शिकलेले तिचे वडील विजय विसपुते हे तीस वर्षांपासून घरोघरी वृत्तपत्र टाकतात. आई प्रज्ञा ही देखील जिद्दी आहे. आर्याची लहान बहीण वृष्टी सहावीला आहे. तिनेही पहिलीपासून प्रथम क्रमांक सोडलेला नाही. आर्या पाचवीपासून अव्वल पाचमध्ये स्थान मिळवत आली. पहाटे पाचला ती पाठांतर, तर सायंकाळी नोट्स काढायची. दुपारी बारा ते पाच शाळा, संध्याकाळी आईला मदत करणे आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास, अशी तिची दिनचर्या. वाचनाची आवड. दिवंगत राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तक वाचून इस्त्रोत जाण्याची प्रेरणा घेतली.
Percentage: 91.60 %
Account Details
YASH PRADIP PATIL
वडील दारोदारी फिरून खेळणी, आरसे, कंगवे असे कटलरी सामान विकतात. यातून मिळकत जेमतेम दोनतीनशे रुपये. शिवाजीनगर परिसरात राहायला व शिकायला मराठा हायस्कूलमध्ये. शिवाजीनगर ते शाळा अंतर भरपूर अशावेळी कमी पैशांत त्याची शाळेत जाण्यायेण्याची सुविधा क्लासचालक शिक्षिकेने हा संघर्ष पाहिलेला. त्यांनी त्याला सवलत देऊन क्लास लावला. त्यामुळे शाळा आणि क्लास असा दुहेरी अभ्यास. याव्यतिरिक्त घरीही तीन ते चार तास अभ्यास. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान तर रात्री दोन वाजता उठून तो पुस्तक हाती घ्यायचा. चुलतभावाने मार्गदर्शन केले. गुजरातमध्ये कंपनीत असलेल्या काकाने आर्थिक मदत केली. शेजाऱ्यांच्या जुन्या सायकलचा वापर केला. खूप शिकून डॉक्टर होऊन आईवडिलांच्या संघर्षावर यशाचा झेंडा फडकवणारच असे तो म्हणतो.
Percentage: 94.40 %
Account Details
RITESH SIDDHARTH PRADHAN
त्याला प्राध्यापक व्हायचे आहे. रितेश सिद्धार्थ प्रधान याने मालतीबाई कुलकर्णी विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. रितेशची हुशारी ओळखून कोणी त्याला पुस्तकांची मदत दिली, तर कोणी शैक्षणिक साहित्य पुरवले. यातून अभ्यास करीत त्याने घवघवीत यश मिळवले. आई सातवी, तर वडील बारावी शिकलेले. पारिजातनगर येथील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत आई आशा प्रधान, वडील सिद्धार्थ प्रधान व लहान भाऊ श्रेयस प्रधान यांच्यासह गेल्या दहा वर्षांपासून रितेश वास्तव्यास आहे. चार जणांना राहण्या- झोपण्यासाठीही पुरेशी जागा खोलीत नाही. आई सोसायटीतील घरांमध्ये धुणीभांडी करते, तर वडिल वॉचमन व कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. रोज पहाटे चार वाजता उठून आठ वाजेपर्यंत गणित विषयाचा अभ्यास करणे, त्यानंतर शाळा व शाळेतून घरी आल्यानंतर त्या दिवशी शिकवण्यात आलेल्या विषयांची उजळणी व इतर विषयांचा अभ्यास तो करीत असे.
Percentage: 92.20 %
Account Details
YOGITA SANTOSH JADHAV
श्रीराम विद्यालयात शिकलेल्या योगिता जाधव हिने कोणताही खासगी क्लास लावला नाही. पहाटे लवकर उठून अभ्यास करणे हा तिचा नित्यक्रम. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांची प्रेरणा यांच्यामुळे हे यश मिळाले असल्याचे ती सांगते. इलेक्ट्रिकल इंजिनीअर होऊन आई-वडिलांना आधार देण्याची इच्छा. योगीताला अभ्यासबरोबरच साहित्य, कलेतही रस. अमृतधाम-हिरावाडी रोडवरील भावसंगम सोसायटी परिसरात वास्तवाला. रिक्षाचालक वडील संतोष, दुसऱ्याच्या घरी जाऊन स्वयंपाक बनविण्याचे काम करणारी आई रुपाली, मोठी बहीण अक्षदा, भाऊ मनीष असे पाचजण कुटुंबात आहेत.
Percentage: 93.20 %
Account Details
SOHAN RAVIKANT SARKATE
दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा सोहन सरकटे ‘आयआयटी’ मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मालतीबाई कुलकर्णी विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली. रोजंदारीवर पेंटिंगची कामे करणारे वडील रविकांत आणि चारघरची धुणीभांडी करून संसाराला हातभार लावणारी आई सीमा. गंगापूररोडवरील निर्मला अव्हेन्यू इमारतीच्या पार्किंगमधील खोली म्हणजे सोहनचे घर. वॉचमनचं काम करण्याच्या अटीवर मिळालेला हा निवारा. त्यात सोहनसह त्याचे आईवडील आणि लहान बहीण वैष्णवी राहते. रोज सकाळी साडेपाचला दिवसाची सुरुवात, सकाळी ७ ते १२ शाळा झाल्यानंतर सोहन दोन वाजता शाळेतीलच एका मैत्रिणीच्या घरी तिच्या आईच्या मागदर्शनाखाली अभ्यास, त्याची चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य पाहून एका वाचनालयानेही त्याला रात्री दहापर्यंत वाचनालयात अभ्यास करण्याची परवानगी दिली होती.
Percentage: 94 %
Account Details
MAYUR RAVINDRA PATIL
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मयूरचं पितृछत्र हरपले. पाठीच्या चार मणक्यांमध्ये गॅप असतानादेखील शिवणकाम करून आईने दहावीपर्यंत त्याला शिकवले. रोज कसेबसे दोनशे रुपये मिळतात. त्यात घरखर्च आणि मयूरचं शिक्षण अशी कसरत त्याच्या आईला करावी लागते.