Aurangabad Archives | MT Culture Club

aurangabad

Preeti Kashinath Jadhav

औरंगाबादमधील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयातून ९१.७६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. खुलताबाद तालुक्यातील कानडवाडी हे तिचे गाव. वडिलांकडे फक्त एक एकर कोरडवाहू शेती. घरी खाणारी तोंडे सात. त्यामुळे ते शेतमजूर म्हणून काम करतात. गावात फक्त सातवीपर्यंत शाळा. त्यामुळे प्रीतीच्या मामा गणेश नरोडे यांनी तिला चौथीनंतर औरंगाबादला आणले. ते ही एका गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करतात. प्रीती शाळा संपली की गावी जायची. शेतात मजुरी करायची. नव्या पुस्तकांचा गंध तिला माहितच नाही. अशा परिस्थितीतही तिने यशाला गवसणी घातली. आता तिला कम्प्युटर इंजिनिअर व्हायचे असून, तुमच्या मदतीची गरज आहे.

Percentage: 91.76 %

Kale Mayur Shankar

औरंगाबादमधील ओम प्राथमिक विद्यामंदिरातून ९१ टक्के गुण घेऊन दहावी उत्तीर्ण झाला. त्याचे वडील त्याच शाळेत शिपाई म्हणून काम करतात. पगार अत्यंत तुटपुंजा. त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी मयूरची आई शीतल या ‘मेस’चे डबे पुरवतात. परिस्थिती इतकी खडतर की मयूरला शाळेसाठी सायकल घेऊन देणेही वडिलांना शक्य नव्हते. त्यामुळे घर ते शाळा आणि शाळा ते घर असे एकूण पंधरा किलोमीटरचे अंतर तो चक्क पायपीट करायचा. या सगळ्यावर मात करून त्याने दहावीत भरारी घेतली आहे. आता त्याला डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठी पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत हवी आहे.

Percentage: 91 %

Rupali Prakash Gangwe

औरंगाबादमधील महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेतून दहावी ९०.२०टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. तिच्या घरची परिस्थिती प्रचंड हलाकीची. वडील लहानपणी वडील गेले. रूपलीची आई आपल्या दोन्ही मुली, मुलाला धुणी-भांडी करून वाढवले. रूपाली शाळा सुटली की, आजही आईला कामाला मदत करायची. तिच्या आईला महिनाकाठी फक्त साडेपाचहजार रुपये मिळतात. त्यातले साडेतीन हजार रुपये घरभाड्यासाठी जातात. उर्वरित दोन हजारांत किराणा, मुलांचे शिक्षण करताना ओढाताण होते. आता रूपालीला शिकून ‘आयएएस’ अधिकारी व्हायचे आहे. पुढील शिक्षणासाठी तिला आर्थिक मदत हवी आहे.

Percentage: 90.20 %