Srushti Jitendra Dhengre
Arun Ramchandra KerojiClub 28 Aug 2020 9:21 am

सोमलवार रामदासपेठ येथून सृष्टी ढेंगरे हिने दहावीची परीक्षा यंदा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तिने ९४ टक्के
गुणांसहित आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. मानेवाडा रोडवरील बालाजीनगर परिसरात
सृष्टीचे घर आहे. तिचे वडील ऑटोचालक होते. करोनाकाळाने त्यांच्याही समोर आव्हान उभे केले आहे. शहरात
ऑटॊरिक्षा चालत नसल्याने त्यांचे उत्पन्न थांबले आहे. आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांना भंगारविक्रीच्या
कामाकडे वळावे लागले. आई शालिनी गृहिणी असून तिला सातवीत शिकणारा एक भाऊदेखील आहे.
शाळेतील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये हुशार म्हणून सृष्टीची गणना होते. तिच्या पाठीमागेही शिक्षक तिचे
कौतुक करण्यात शब्दांची कसूर करीत नाहीत. घरी अडचणी आहेत म्हणून सृष्टीने स्वप्न बघणे बंद केलेले नाही.
तिच्या विश्वात तिने स्वतंत्र सृष्टी निर्माण केली आहे. या विश्वात ती स्वत:ला डॉक्टर झालेली आणि रुग्णांवर
उपचार करताना बघते. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या सृष्टीकडे यासाठी गुणवत्ता आहे आणि कष्ट
घेण्याची तयारीदेखील. आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीची तिला जाणीव आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यात
येणार्‍या अडचणींची. असे असले तरीही या अडचणींवर मात करून ठरविलेले लक्ष्य कुठल्याही परिस्थितीत पूर्ण
करण्याची जिद्द तिने बाळगले आहे.

    [addtoany]