Sarthak Mohan Deshmukh
Club 28 Aug 2020 9:19 am

कोराडी येथील विद्यामंदिर शाळेत शिकणार्‍या सार्थकने दहावीच्या शालांत परीक्षेत ९० टक्के गुण
मिळविले आहेत. सार्थकचे कुटुंब बोखारा परिसरातील बजरंग नगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याचे
वडील कोराडी येथील औष्णिक विद्युतकेंद्रात रोजंदारी कामगार आहेत. याशिवाय, त्याची ज्योत्स्ना
आई जेवणाचे डबे करून घरखर्चाला हातभार लावते. सार्थकची पाठची बहीणही आता दहावीला आहे.
बोखारा परिसरात हे कुटुंब भाड्याच्या घरात राहते.
आर्थिक परिस्थिती अडचणीची असली तरी या कुटुंबाची मुलांना शिकविण्याची जिद्द उदंड आहे. पडेल
ती तोशीस सहन करून मुलांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून द्यायच्या याकरिता सार्थकचे पालक
सातत्याने प्रयत्न करीत असतात.त्यांच्या या प्रयत्नांची आणि आस्थेची जाणिव सार्थकला देखील आहे.
दहावीची वेस आता कुठे ओलांडलेल्या या गुणी मुलाच्या डॊळ्यात उद्याची स्वप्ने तरळत आहेत.
आयएएस होऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुधारायचे ही त्याची महत्वाकांक्षा आहे.
’कलेक्टर व्हायचे आहे’, सार्थक आपले स्वप्न बोलून दाखवतो. शिकण्याची आवड आणि डोक्यात ध्येय
असलेला हा गुणवंत विद्यार्थी प्रयत्नांतही मागे नाही याची चुणूक त्याने दहावीत दाखवून दिली आहे.
आपल्या आईबाबांनी आवडीने ठेवलेल्या नावाचे चीज करण्याची त्याची जिद्द आहे.

    [addtoany]