Planet Campus with Ignite Educon

११ वीच्या उंबरठ्यावर
लवकरच आपला पाल्य १० वी ची परीक्षा संपवून एक स्पर्धात्मक युगात प्रवेश करणार आहे. शाळेची सुरक्षित चौकट ओलांडताना एक पालक म्हणून, त्यांच्या भविष्याबाबत निर्णय घेताना, आपल्या मनात प्रश्नांचे काहूर माजले असेल. मागील काही वर्षापासून समुपदेशनाचे कार्य करीत असताना अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आलो आहोत. म्हणूनच खालील प्रश्नांचे निरसन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आम्हास वाटते.
• ११ वी मध्ये शाखा कोणती निवडावी, Sci / Com/ Arts ?
• यापुढील १० -१५ वर्षात कोणते करिअर जास्त आशावादी असेल ?
• सायन्स शाखा निवडली तर PCM / PCB किंवा PCMB यात कुठले विषय निवडावे ?
• सायन शाखेमध्ये Bifocal म्हणजे काय व त्यांचे फायदे काय ?
•Diploma करून Engineering च्या दुसर्या वर्षात ऍडमिशन घ्यावी कि १० + २ करून स्पर्धा परीक्षा मार्फत डायरेक्ट B.E. / B.Tech करावे ?
• १० + २ व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कितपत अवघड असतो, माझ्या पाल्यास तो झेपेल का ?
• JEE ( Main ) , JEE ( Adv) व CET मध्ये काय फरक आहे ?
•JEE ( Main ) न देता फक्त CET दिली तर त्याचे तोटे काय ?
•मेडिकल करियर खरंच खूप अवघड आहे का ? त्याच्यासाठी ची स्पर्धा परीक्षा कुठली ?
• Engineering & Medical व्यतिरिक्त काय पर्याय आहे ?
• चांगले व योग्य जुनियर कॉलेज निवडीचे निकष काय ?
• क्लासेसच्या असंख्य जाहिरातींचा मारा होत आहे. योग्य क्लासची निवड कशी करावी ?
• Integrated course बद्दल आम्ही बरंच काही ऐकतोय, अशा Integrated courses मध्ये ऍडमिशन घेताना काही संभाव्य धोके आहेत का ? Is it legal & safe ?