
नवरात्र म्हणजे उत्सव शक्तीचा,तेजाचा आणि रंगांचाही, नवरात्राचे औचित्य साधून उत्साही महिलांनी विविधरंगी साठ्या परिधान करून आपली छायाचित्रे पाठवणे आणि महाराष्ट्र टाइम्सने त्यास प्रसिद्धी देणे हा दरवर्षीचा एक आनंदसोहळा असतो. यंदा तर उत्साह आणि आनंद देणान्या अशा उपक्रमांची अधिकच गरज आहे.त्यामळे तम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाहीतुमची अयाचित्रे आम्हाला पाठवा. सध्याच्या काळात घराचा परिसर असो. सार्वजनिक जागा असो वा कार्यालय सगळ्यांच्याच वावरावर आरोग्यसुरक्षेसाठी काही आवश्यक निर्बध आहेत.त्यामुळे यंदा छायाचित्रे काढताना अतिशय दक्षता बाळगा. त्या त्या दिवशी त्या त्या रंगाच्या साड्या ड्रेस परिधान केलेली तुमची छायाचित्रे दुपारी ३पर्यंत आम्हाला पाठवा. त्यातील निवडक छायाचित्रे 'मटामध्ये प्रसिद्ध केली जातील.