MTCC Supersutti | MT Culture Club

MTCC Supersutti
वारसाओळख


‘युनेस्को’ प्रमाणित जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या काही वास्तू आम्ही या वेबपेजवर प्रसिद्ध करणार आहोत. येथील छायाचित्रासह या वास्तूविषयीची माहितीदेखील येथे थोडक्यात दिली आहे. संबंधित वास्तूचे वैशिष्ट्य, ती कुठल्या कारणाने ओळखली जाते, ती कुठल्या शहरात किंवा राज्यात आहे, याचे तपशील येथे आहेत. तुम्ही या ठिकाणाला भेट दिली असेल, या वास्तूच्या सहवासात तुम्ही वेळ घालवला असेल, तर आम्हाला तुमच्या त्या अनुभवाविषयी आणि प्रवासाविषयी लिहून कळवा.Agra Fort
आग्र्याचा किल्ला हा भुईकोट किल्ला आग्रा शहरात आहे. यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध ताजमहाल येथून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. भारताचे मुगल सम्राट बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब येथे राहून भारतावर शासन करीत होते. १८५७च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामावेळी हा किल्ला युद्धाचे प्रमुख केंद्र होता.Jantar-Mantar rajasthan
जंतर मंतर राजा सवाई जयसिंग यांनी १७२४ ते १७३४ या कालावधीत राजस्थान राज्यातील जयपूर येथे जंतरमंतर ही खगोल वेधशाळा बांधली. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या या वेधशाळेत १४ प्रमुख यंत्र आहेत. त्यातून कालमोजणी, ग्रहणाविषयीचे भविष्यकथन, एखाद्या ताऱ्याची गती आणि स्थिती आणि सूर्यमालेतील ग्रहांचे परिणाम समजून घेता येतात. जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारत : एक खोज’ या आपल्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे. जयसिंग यांनी बांधलेल्या पाच वेधशाळांपैकी आज फक्त दिल्ली आणि जयपूर येथील जंतरमंतरच उरले आहेत.Mahabalipuram Tamilnadu
महाबलिपुरम तमिळनाडू राज्यातील चेंगलपट्टु जिल्ह्यात हे शहर आहे. हे मंदिरांचे शहर असून, राजधानी चेन्नईपासून जेमतेम ५५ किलोमीटरवर आहे. सातव्या शतकात हे शहर म्हणजे पल्लव राजांची राजधानी होती. द्रविड वास्तुकलेच्या दृष्टीने हे शहर महत्त्वाचे असून, येथे दगडातून मंदिरे बांधण्यात आली आहेत. येथील रथ मंदिर आणि वाळूचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच्या मधोमध विष्णूचे मंदिर असून, दोन्ही बाजूला शिवमंदिर आहे.Queens's lake - step stone patan Gujrat
राणीची बाव गुजरात राज्यातील पाटण शहरात ही दगडी पायऱ्यांची विहीर आहे. या स्थळाचे चित्र जुलै २०१८मध्ये रिझर्व्ह बँकेच्या शंभर रुपयांच्या नोटेवर प्रसिद्ध करण्यात आले होते. २२ जून २०१४ रोजी ‘राणीची बाव’ ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. सोलंकी साम्राज्यातील राजा पहिल्या भीमदेवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याची पत्नी राणी उदयामतीने १०६३मध्ये बांधून घेतली, असे सांगितले जाते. एके काळी सरस्वती नदीच्या पाण्यामुळे ही विहीर गाळाने भरली होती.Pattadkal karnatak world-heritage-day
पट्टदकल पट्टदकल येथील काशीविश्वनाथ मंदिर कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यातील एक खेडे आहे. येथील ऐतिहासिक मंदिरांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दर वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्योत्सव येथे होतो. पट्टदकल चालुक्य राजघराण्याची राजधानी होती. ‘ए गाइड टू जिओग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील काळाच्या संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता, असा उल्लेख आहे. इ.स.च्या आठव्या शतकात बांधली गेलेली ही मंदिरे भारतीय द्राविड आणि नागर या दोन्ही स्थापत्यशैलीत आहेत.The_Sanchi_Stupas
सांचीचा स्तूप मध्य प्रदेश राज्यातील सर्वांत उंचावर असलेल्या माळवा पठारावर सांची हे ठिकाण आहे. सांची येथील स्तूपावर शिंग असलेला सिंह आणि पंख असलेला वाघ कोरला आहे. सांची येथे चार सिंहांचा पुतळा आहे. लांबून पाहताना स्तूपाची प्रवेशद्वारं (तोरणं) स्तूपाएवढी उंच वाटतात; पण प्रत्यक्षात ती ८.५ मीटर उंच आहेत.

Share your experience *
Do you get a copy of Maharashtra Times at your home?*