म. टा. सन्मान – २०२२’ आला! | MT Culture Club

म. टा. सन्मान – २०२२’ आला!

आपली पसंती नोंदवा, चित्रपटांचे पुरस्कार ठरवा

मराठी मनोरंजनसृष्टीत अत्यंत मानाचा आणि कलाकारांच्या प्रतिभेला मनःपूर्वक दाद देणारा ‘म. टा. सन्मान २०२२’ नेहमीच्याच दिमाखात पुन्हा आला आहे. करोनाकाळातही मनोरंजन उद्योगाची पताका झळकती ठेवणारांच्या उत्साहाला मटा सन्मान सलाम करत आहे. 
गेल्या काही वर्षांत पुरस्कारांची संख्या अमाप वाढल्यानंतरही ‘म. टा. सन्मान’चे महत्त्व आणि माहात्म्य सतत वाढत राहिले आहे ते या पुरस्कारांच्या निष्पक्ष आणि सर्वथा योग्य, चोखंदळ निवडीमुळे.  
चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वेबसीरिजमधील उत्तम कामगिरीसाठी यावर्षी पुरस्कार दिले जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात फारशी नवी नाटके येऊ शकली नाहीत, त्यामुळे या वर्षीच्या स्पर्धेत नाट्यविभाग नसेल.  
गेल्या वर्षी मटा सन्मानचा कार्यक्रम होऊ शकला नाही, त्यामुळे मटा सन्मान २०२२ मध्ये दोन्ही वर्षातील चित्रपटांचा समावेश करण्यात येत आहे. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत चित्रपटगृहांत आणि ओटीटीवर झळकलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांनी आपल्या पसंतीच्या मराठी चित्रपट,कलावंत आणि तंत्रज्ञांची निवड करावयाची आहे. त्यातून सर्वाधिक पसंतीच्या पंधरा चित्रपटांची यादी परीक्षकाकडे दिली जाईल. परीक्षक त्यांतून अंतीम विजेत्यांची निवड करतील.   
 

आपली पसंती आपण अशी नोंदवू शकता- 

प्रत्येक विभागाच्या चौकोनातील बाणावर क्लिक करताच चित्रपटांची यादी दिसेल. त्या विभागासाठी आपणांस ज्या चित्रपटाची शिफारस करावयाची आहे त्याचे नाव तुम्ही सिलेक्ट करु शकता. 
 
सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता अभिनेत्री, गीतकार, गायक गायिका या विभागांपुढे वेगळे चौकोन दिले आहेत. पहिल्या चौकोनात चित्रपटाचे नाव निवडायचे. त्या पुढील चौकोनात आपल्या पसंतीच्या कलावंताचे, गीतकाराचे, गायक गायिकेचे नाव लिहायचे. टर्म्स आणि कंडिशन्स स्वीकारार्ह असल्याचे क्लीक करुन सांगायचे आणि VOTE वर क्लीक करून अंतीमतः सबमिट करायचे. आपली पसंती येत्या २४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नोंदविता येईल. त्यानंतरची मते विचारात घेतली जाणार नाहीत.

 

The voting is now closed