मटा सन्मान : इथे भरा प्रवेश अर्ज | MT Culture Club

मटा सन्मान : इथे भरा प्रवेश अर्ज

चित्रपट , टीव्ही मालिका या कलाप्रांतांमध्ये १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत निर्विवाद कर्तृत्त्व गाजवणा-या प्रतिभावंतांनो सिद्ध व्हा…

सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतींना मानाचा मुजरा करणारा म.टा.सन्मान २०२२ चा सोहळा लवकरच दिमाखात साजरा होणार आहे. प्रकाशाच्या लखलखाटात आणि टाळ्यांच्या गजरात म.टा सन्मानचे मानचिन्ह मिळवण्यासाठी तयारीला लागा…

पुढील लिंक्सवर क्लिक करून फॉर्म भरा. सोबत स्पर्धेचे नियम बारकाईने वाचायला विसरू नका.

The voting is now closed

 

चित्रपट

१)सर्वोत्कृष्ट चित्रपट, २)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३)सर्वोत्कृष्ट अभिनेता, ४)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ५)सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, ६)सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, ७)सर्वोत्कृष्ट पटकथा, ८)सर्वोत्कृष्ट संवाद, ९)सर्वोत्कृष्ट गीतकार, १०)सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, ११)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, १२)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, १३)सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, १४)सर्वोत्कृष्ट संकलन, १५)सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक

मालिका आणि वेब सिरीजच्या प्रवेशिका ऑनलाइन स्वीकारण्याचा शेवटचा दिवस – २८ फेब्रुवारी २०२२

वेब सिरीज

१) सर्वोत्कृष्ट वेब सिरीज २) सर्वोत्कृष्ट कथा-पटकथा ३) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

टीव्ही मालिका

१) सर्वोत्कृष्ट मालिका, २) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ३) सर्वोत्कृष्ट पटकथा, ४) सर्वोत्कृष्ट अभिनेता, ५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ६) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, ७) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, ८) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, ९) सर्वोत्कृष्ट संकलन, १०) सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत.

म. टा. सन्मान २०२२, प्रवेश नियम

परीक्षक व निकाल : स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी ( चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरीज ) स्वतंत्र परीक्षक मंडळ नेमण्यात येईल. परीक्षक मंडळाने दिलेल्या निर्णयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यवस्थापनाने शिक्कामोर्तब केल्यावर अंतिम निकालपत्र तयार होईल. अंतिम निकाल ‘म. टा. सन्मान २०२२’ सोहळ्यात जाहीर केला जाईल. हा निकाल सर्वांना बंधनकारक राहील.

मराठी चित्रपट विभाग

१) अंतिम फेरीत दाखल झालेल्या चित्रपट परीक्षकांना दाखवले जातील. त्यासाठी निर्मात्यांना/ दिग्दर्शकाला ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे संबंधित सिनेमा समाविष्ट असलेले चार पेनड्राईव्ह सुपूर्त करावे लागतील.

२) चित्रपट १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रदर्शित होऊन त्याच कालावधीत किमान एका चित्रपटगृहामध्ये एक आठवडा दाखवण्यात आलेला असावा. तसेच थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेला सिनेमा देखील स्पर्धेत सहभागी असेल.

३) वाचकांच्या मतांची आकडेवारी बीसीसीएल व्यतिरिक्त अन्य कोणालाही उपलब्ध होणार नाही.

४) १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रदर्शित झालेले सर्व मराठी चित्रपट ‘म. टा. सन्मान २०२२’ मतदानासाठी (वाचक कौल) ग्राह्य धरण्यात येतील

५) निर्मात्यांनी चित्रपटाचा पात्र परिचय, कलाकार यादी, श्रेय सूची (कास्ट अँड क्रेडिट लिस्ट), गाणी (गाण्याचे बोल) अधिकृतरित्या ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे सुपूर्त करावी.

मराठी टीव्ही मालिकाविभाग

१) टीव्ही मालिका : टीव्ही मालिका निर्मात्यांनी मालिकेतील १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात दाखवण्यात आलेल्या भागांपैकी तीन भागांची पेनड्राईव्ह तयार करून त्यांच्या एकूण चार प्रती परीक्षणासाठी द्याव्यात. आपण देत असलेल्या भागांमध्ये शीर्षकगीताचा समावेश असेल याची काळजी घ्यावी. आपण दिलेल्या भागात मालिकेतील सर्व कलाकार असतील याची काळजी घ्यावी. तसेच त्यांची नावे प्रवेशिकेसोबत जोडावीत. कलाकारांच्या नावासमोर त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

२) कागदपत्रे : ज्या वाहिनीवरून मालिका दाखवण्यात आली आहे, त्या संबंधित टीव्ही वाहिनीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) टीव्ही मालिका निर्मात्यांनी प्रवेशिकेसोबत पाठवणे गरजेचे आहे.

४) प्रवेशिका : टीव्ही मालिका निर्मात्यांच्या स्वाक्षरीने आलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार,तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

मराठी वेब सिरीज विभाग

१) १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आलेल्या मराठी वेब मालिका यात सहभागी होऊ शकतील. या भागांपैकी सहा भागांचा पेनड्राईव्ह तयार करून त्यांच्या एकूण चार प्रती परीक्षणासाठी द्याव्यात. आपण दिलेल्या भागात मालिकेतील प्रमुख कलाकार असतील याची काळजी घ्यावी.

३) कागदपत्रे : ओटीटी प्लॅटफॉर्मचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) निर्मात्यांनी जोडणे आवश्यक आहे.

४) प्रवेशिका : वेब सिरीज निर्मात्यानेच प्रवेशिका भरणे आवश्यक आहे. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका पाठवू नयेत. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.