म. टा. सन्मान २०२४, प्रवेश नियम
परीक्षक व निकाल : स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरीज) स्वतंत्र परीक्षक मंडळ नेमण्यात येईल. परीक्षक मंडळाने दिलेल्या निर्णयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यवस्थापनाने शिक्कामोर्तब केल्यावर अंतिम निकालपत्र तयार होईल. अंतिम निकाल ‘म. टा. सन्मान २०२४’ सोहळ्यात जाहीर केला जाईल. हा निकाल सर्वांना बंधनकारक राहील.
मराठी चित्रपट विभाग
१) मानांकन मिळालेल्या चित्रपटांच्या परीक्षकांकरता चित्रपट पेन ड्राइव्ह अथवा लिंकवर पाहण्याची व्यवस्था संबंधित निर्मिती संस्थेला करावी लागेल.
२) चित्रपट १ जानेवारी २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रदर्शित होऊन त्याच कालावधीत किमान एका चित्रपटगृहामध्ये सलग एक आठवडा दाखवण्यात आलेला असावा.
३) १ जानेवारी २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रदर्शित झालेले सर्व मराठी चित्रपट ‘म. टा. सन्मान २०२४’ मतदानासाठी (वाचक कौल) ग्राह्य धरण्यात येतील.
मराठी नाटक विभाग (व्यावसायिक)
१) नाट्यप्रयोग : स्पर्धेत सहभागी झालेली नाटके परीक्षकांना पाहता यावीत, म्हणून येत्या २५ डिसेंबर पर्यंत संबंधित नाटकाचा प्रयोग मुंबई परिसरातच लावण्याची व्यवस्था निर्मात्यांनी करावी. तसेच मुंबई परिसरात निश्चित झालेल्या प्रयोगांची तारीख, वेळ आणि ठिकाणे यांची यादी प्रवेशिकेसोबत जोडावी. याखेरीज जे प्रयोग नंतर (परंतु २५ डिसेंबरच्या आधी) ठरतील त्यांची माहिती वेळोवेळी संबंधितांना आणि
matasanman@gmail.com वर द्यावी.
२) कागदपत्रे : प्रवेशिकेसोबत नाटक निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे. नाटक व्यावसायिक विभागात आहे हे त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावरून ठरवण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
३) प्रवेशिका : नाट्यनिर्मात्यांने अथवा निर्मिती संस्थेने भरलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. आवश्यक ती कागदपत्रेही स्कॅन करून प्रवेशिकेसोबतत जोडणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे : व्यावसायिक नाट्यस्पर्धा किमान तीन नाटके स्पर्धेत असायला हवीत. तसे नसल्यास पुरस्कार देणे किंवा न देण्याचा निर्णय आयोजक घेतील.