म. टा. सन्मान २०२६
(मराठी चित्रपट, व्यावसायिक नाटक, मालिका, वेब सिरीज) सर्वसाधारण प्रवेश नियम
पात्रता
चित्रपट विभाग
- वर्ष २०२५ मध्ये प्रदर्शित झालेले सर्व मराठी सिनेमे ‘मटा सन्मान’च्या प्राथमिक फेरीत सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
- संकेतस्थळावर वाचकांना त्यांच्या आवडत्या सिनेमासाठी ‘वाचक कौल’ द्यायचा आहे.
- प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी ठराविक सिनेमे प्रत्यक्ष परीक्षक परीक्षणासाठी निवडले जातील.
- अंतिम फेरीत दाखल झालेले चित्रपट परीक्षक मंडळा दाखवले जातील.
- सिनेमांची ऑनलाइन पासवर्ड प्रोटेक्टड लिंक 'महाराष्ट्र टाइम्स' कडे द्यावी लागेल (जी पुढे किमान दोन महिने लाइव्ह राहील अशी असावी).
- अंतिम फेरीत दाखल झालेले चित्रपट परीक्षकांना दाखवले जातील. त्यासाठी निर्मात्यांना/दिग्दर्शकाला ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे संबंधित सिनेमा समाविष्ट असलेले चार पेनड्राईव्ह सुपूर्द करायचे आहेत.
- चित्रपट १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रदर्शित होऊन त्याच कालावधीत एका चित्रपटगृहामध्ये सलग किमान एक आठवडा दाखवण्यात आलेला असावा. तसेच थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेले चित्रपटदेखील स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र असतील.
- वाचकांच्या मतांची आकडेवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’ व्यतिरिक्त अन्य कोणालाही आणि कोणत्याही कारणासाठी उपलब्ध होणार नाही.
- १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रदर्शित झालेल्यांपैकी ज्यांचीं माहिती उपलब्ध झाली असे सर्व मराठी चित्रपट ‘म. टा. सन्मान २०२६’ मतदानासाठी (वाचक कौल) ग्राह्य धरण्यात येतील.
- अंतिम फेरीत दाखल झालेल्या सिनेमांच्या निर्मात्यांशी/दिग्दर्शकाशी ‘मटा प्रतिनिधी’ संपर्क साधेल.
- निर्मात्यांनी चित्रपटातील पात्र परिचय, कलाकारांची यादी, श्रेय सूची (कास्ट अँड क्रेडिट लिस्ट), गाणी (गाण्याचे बोल) या बाबतची सविस्तर माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे देणे आवश्यक आहे.
नाटक विभाग (व्यावसायिक)
- नाट्यप्रयोग:
१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रंगभूमीवर आलेली नवीन व्यावसायिक नाटके स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या नाटकांचे ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी किमान ५ प्रयोग झालेले असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी झालेली नाटके परीक्षकांना पाहता यावीत, म्हणून येत्या १० फेब्रुवारी २०२६पर्यंत संबंधित नाटकाचा प्रयोग मुंबई, ठाणे परिसरातच लावण्याची व्यवस्था निर्मात्यांनी करावी. तसेच मुंबई परिसरात निश्चित झालेल्या प्रयोगांची तारीख, वेळ आणि ठिकाणे यांची यादी प्रवेशिकेसोबत जोडावी. प्रयोगांच्या तारखेसंबंधीची माहिती वेळोवेळी संबंधित समन्वयक यांना आणि matasanman@gmail.com वर द्यावी.
- कागदपत्रे:
प्रवेशिकेसोबत नाटक निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र जोडणे अत्यावश्यक आहे. नाटक व्यावसायिक विभागात आहे हे त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावरून ठरवण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- प्रवेशिका:
नाट्यनिर्मात्याने अथवा निर्मिती संस्थेने भरलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. आवश्यक ती कागदपत्रेही स्कॅन करून प्रवेशिकेसोबतच जोडणे आवश्यक आहे.
- परीक्षकांचा निर्णय:
परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
टीव्ही विभाग
- परीक्षक व निकाल:
स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका) स्वतंत्र परीक्षक मंडळ नेमण्यात येईल. परीक्षक मंडळाने दिलेल्या निर्णयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यवस्थापनाने शिक्कामोर्तब केल्यावर अंतिम निकालपत्र तयार होईल. अंतिम निकाल ‘म. टा. सन्मान २०२६’ सोहळ्यात जाहीर केला जाईल. हा निकाल सर्वांना बंधनकारक राहील.
- टीव्ही मालिका:
टीव्ही मालिका निर्मात्यांनी मालिकेतील १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात दाखवण्यात आलेल्या भागांपैकी पाच भागांचे एक पेनड्राईव्ह तयार करून त्यांच्या एकूण चार प्रती परीक्षणासाठी द्याव्यात. किंवा मालिकांचे पाच भाग असलेली ओपन लिंक पाठवावी. ही लिंक ३१ मार्च २०२६ पर्यंत सक्रिय असेल असे पाहावे. आपण दिलेल्या भागात मालिकेतील सर्व कलाकार असतील याची काळजी घ्यावी. तसेच त्यांची नावे प्रवेशिकेसोबत जोडावीत. कलाकारांच्या नावासमोर त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. जर आधीच्या वर्षातील भागांची पेनड्राईव्ह किंवा लिंक दिली असल्याचे लक्षात आले तर ती प्रवेशिका बाद ठरवण्यात येईल.
- कागदपत्रे:
ज्या वाहिनीवरून मालिका दाखवण्यात आली आहे, त्या संबंधित टीव्ही वाहिनीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) टीव्ही मालिका निर्मात्यांनी जोडावे. हे प्रमाणपत्र वाहिनीच्या लेटरहेडवर असणे बंधनकारक आहे. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ हार्ड कॉपी म्हणजे प्रत्यक्ष प्रिंटआऊट स्वरूपात किंवा वाहिनीच्या संबंधित अधिकारी व्यक्तीच्या अधिकृत ईमेल आयडीवरून ‘मटा’च्या संबंधित व्यक्तीच्या अधिकृत ईमेल-आयडीवर पाठवले तरी ग्राह्य धरले जाईल. ईमेल केल्यास सबजेक्टमध्ये ‘MaTa Sanman 2026 NOC’ असे नमूद करावे.
- प्रवेशिका:
टीव्ही मालिका निर्मात्यांनी भरलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरित्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. नियमात न बसणाऱ्या व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. आवश्यक त्या सर्व गोष्टी व कागदपत्रांसह प्रवेशिका 'महाराष्ट्र टाइम्स'च्या ऑफिसमध्ये रविवार सोडून इतर दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावी किंवा नमूद केलेल्या अंतिम तारखेपर्यंत ‘मटा’च्या संबंधित व्यक्तीच्या अधिकृत ईमेल-आयडीवर पाठवावीत.
वेब सीरिज
- परीक्षक व निकाल:
स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका) स्वतंत्र परीक्षक मंडळ नेमण्यात येईल. परीक्षक मंडळाने दिलेल्या निर्णयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यवस्थापनाने शिक्कामोर्तब केल्यावर अंतिम निकालपत्र तयार होईल. अंतिम निकाल ‘म. टा. सन्मान २०२५’ सोहळ्यात जाहीर केला जाईल. हा निकाल सर्वांना बंधनकारक राहील.
- वेब सीरिज:
वेब सीरिज निर्मात्यांनी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात प्रदर्शित झालेल्या सीरिजचाच अर्ज पाठवावा. पाच भागांची एक पेनड्राईव्ह तयार करून त्यांच्या एकूण चार प्रती परीक्षणासाठी द्याव्यात किंवा सीरिजचे पाच भाग असलेली ओपन लिंक पाठवावी. ही लिंक ३१ मार्च, २०२६ पर्यंत सक्रिय असेल असे पाहावे. आपण दिलेल्या भागात सीरिजमधील सर्व कलाकार असतील याची काळजी घ्यावी. तसेच त्यांची नावे प्रवेशिकेसोबत जोडावीत. कलाकारांच्या नावासमोर त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. जर आधीच्या वर्षातील सीरिजचे पेनड्राईव्ह दिले असल्याचे लक्षात आले तर ती प्रवेशिका बाद ठरवण्यात येईल.
- कागदपत्रे:
ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीरिज आली आहे, त्या संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मचे किंवा निर्मिती संस्थेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) सीरिज निर्मात्यांनी जोडावे. हे प्रमाणपत्र ओटीटी प्लॅटफॉर्मच्या लेटरहेडवर असणे बंधनकारक आहे. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ हार्ड कॉपी म्हणजे प्रत्यक्ष प्रिंटआऊट स्वरूपात किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संबंधित अधिकारी व्यक्तीच्या अधिकृत ई-मेल आयडीवरून ‘मटा’च्या संबंधित अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवले तरी ग्राह्य धरले जाईल. ईमेल केल्यास सबजेक्टमध्ये ‘MaTa Sanman 2026 NOC’ असे नमूद करावे.
- प्रवेशिका:
वेब सीरिज निर्मात्यांनी भरलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. नियमात न बसणाऱ्या आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या प्रवेशिका बाद केल्या जातील. त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. आवश्यक त्या सर्व गोष्टी व कागदपत्रांसह प्रवेशिका ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात रविवार सोडून इतर दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावी किंवा नमूद केलेल्या अंतिम तारखेपर्यंत ‘मटा’च्या संबंधित व्यक्तीच्या अधिकृत ईमेल-आयडीवर पाठवावीत.
पुरस्कार
चार विभागांसाठी खालीलप्रमाणे ‘म. टा. सन्मान २०२६’ पुरस्कार देण्यात येतील.
चित्रपट
- सर्वोत्कृष्ट चित्रपट
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट पटकथा
- सर्वोत्कृष्ट संवाद
- सर्वोत्कृष्ट गीत
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
- सर्वोत्कृष्ट संकलन
- सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
नाटक
- सर्वोत्कृष्ट नाटक
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट लेखक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य
- सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
- सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता / अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा
टीव्ही मालिका
- सर्वोत्कृष्ट मालिका
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट पटकथा
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
- सर्वोत्कृष्ट संकलन
- सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत
वेब सिरीज
- सर्वोत्कृष्ट वेब सिरीज
- सर्वोत्कृष्ट लेखन
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
व्यावसायिक नाटक आणि मालिकांच्या प्रवेशिका स्वीकारण्याचा शेवटचा दिवस: १० जानेवारी २०२६
म. टा. सन्मान २०२६, प्रवेश नियम
परीक्षक व निकाल: स्पर्धेच्या प्रत्येक विभागासाठी (नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज) स्वतंत्र परीक्षक मंडळ नेमण्यात येईल. परीक्षक मंडळाने दिलेल्या निर्णयावर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या व्यवस्थापनाने शिक्कामोर्तब केल्यावर अंतिम निकालपत्र तयार होईल. अंतिम निकाल ‘म. टा. सन्मान २०२६’ सोहळ्यात जाहीर केला जाईल. हा निकाल सर्वांना बंधनकारक राहील.
मराठी चित्रपट विभाग
- मानांकन मिळालेल्या चित्रपटांच्या परीक्षकांकरता चित्रपट पेन ड्राईव्ह अथवा लिंकवर पाहण्याची व्यवस्था संबंधित निर्मिती संस्थेला करावी लागेल.
- चित्रपट १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रदर्शित होऊन त्याच कालावधीत किमान एका चित्रपटगृहामध्ये सलग एक आठवडा दाखवण्यात आलेला असावा.
- १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रदर्शित झालेले सर्व मराठी चित्रपट ‘म. टा. सन्मान २०२६’ मतदानासाठी (वाचक कौल) ग्राह्य धरण्यात येतील.
मराठी नाटक विभाग (व्यावसायिक)
- नाट्यप्रयोग: स्पर्धेत सहभागी झालेली नाटके परीक्षकांना पाहता यावीत, म्हणून येत्या १० फेब्रुवारी २०२६पर्यंत संबंधित नाटकाचा प्रयोग मुंबई, ठाणे परिसरातच लावण्याची व्यवस्था निर्मात्यांनी करावी.
- कागदपत्रे: प्रवेशिकेसोबत नाटक निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे. नाटक व्यावसायिक विभागात आहे हे त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्रावरून ठरवण्यात येईल.
- प्रवेशिका: नाट्यनिर्मात्याने अथवा निर्मिती संस्थेने भरलेल्या प्रवेशिकाच स्वीकारल्या जातील. कलाकार, तंत्रज्ञांनी वैयक्तिकरीत्या प्रवेशिका भरून पाठवू नयेत. आवश्यक ती कागदपत्रेही स्कॅन करून प्रवेशिकेसोबतच जोडणे आवश्यक आहे.