Voice over & Film Dubbing Workshop

- आता घरबसल्या शिका व्हॉईस ओव्हर आणि डबिंग स्किल्स
- ह्या सध्याच्या New Normal च्या काळात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचंय? एखाद्या कार्टूनला, कॉर्पोरेट फिल्मला, Audio Books ना आवाज दयायचाय? तर तुम्ही देखील ही सगळी स्किल्स शिकू शकता आणि तुमच्या आवाजाचा वापर करून उत्तम पैसेही कमवू शकता.
- मटा कल्चरल क्लब आणि ए के स्टुडीओ यांच्या संयुक्त विद्यमाने “व्हॉईस ओव्हर आणि डबिंग क्षेत्रातील आजच्या करिअरच्या संधी” या विषयावर मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तुम्हाला कुठेही घराबाहेर न पडता घरच्या घरी ह्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. ही कार्यशाळा ऑनलाईन असल्याने फक्त पुण्यातील नव्हे तर पुण्याबाहेरील सर्वांसाठी देखील खुली आहे. कार्यशाळा, रविवार दिनांक 29 नोव्हेंबर, 2020 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत Zoom application वर आयोजित करण्यात आलेली आहे.
- या कार्यशाळेत , अनेक ऑडीओ बुक्स आणि काव्य क्षेत्रातील नावाजलेले श्री. संदीप खरे आपल्यलाला मार्गदर्शन करायला येणार आहेत. त्याचप्रमाणे ए के स्टुडीओचे संचालक श्री. केदार आठवले, जे गेली १५ वर्षे व्हॉईस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत हे व्हॉईस कल्चर, व्हॉईस मॉड्युलेशन, व्हॉईस ओव्हर टेक्निक्स इत्यादीसाठी गरजेची असणारी तंत्र याची माहिती देतील आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. तसेच लवकरच सर्व वयोगटातील लोकांसाठी ए के स्टुडीओ, पुणे आणि महाराष्ट्र टाईम्स यांच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते श्री विक्रम गोखले, श्री संदीप खरे आणि श्री केदार आठवले ,या तीनही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली Online प्रशिक्षण वर्ग लवकरच सुरु होत आहेत. या प्रशिक्षण वर्गानंतर ए के स्टुडीओच्या पाच शाखांमार्फत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या शहरातील इतर स्टुडिओमध्ये काम मिळवण्यासाठी व्हॉईस डेमो सीडीमार्फत सर्व प्रकारचे मार्गदर्शनही करण्यात येईल.
- ही ऑनलाईन कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून प्रवेश मर्यादित आहेत. मात्र त्यासाठी पूर्व नावनोंदणी अत्यावश्यक आहे. त्यासाठी +९१ ९८२२८ ६७४४८ ह्या क्रमांकावर सकाळी ९ ते सायं.७ ह्या वेळेत संर्पक साधून आपले नाव नोदंवावे.
Similar Experiences