Voice Over And Dubbing Skills | MT Culture Club

Voice Over And Dubbing Skills

Date :Sun February 06, 2022 Time :10:00 am
Sun February 06, 2022
10:00 am

सध्या सर्वजण योग्य काळजी घेऊन unlock च्या दिशेनी वाटचाल करत आहेत. नाट्यगृह, सिनेमागृह पुन्हा सुरु होत आहेत. फिल्म इंडस्ट्री पुन्हा पूर्वपदावर येत आहे. या काळात तुम्हाला नवीन काहीतरी शकायचं आहे? तुमच्या आवाजाच्या माध्यमातून अर्थार्जनाचा एक उत्तम पर्याय तुम्हाला उपलब्ध झाला तर? तुमचा “आवाज” तुमची ओळखही बनू शकतो आणि तुमचं करिअरसुद्धा. अगदी लहान मुलं ते जेष्ठ नागरिक आवाजाच्या क्षेत्रात काम करू शकतात आणि अर्थार्जन करू शकतात. मात्र त्यासाठी आवाजावर योग्य संस्कार करणं आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणंही तितकच महत्वाचं आहे. मटा कल्चरल क्लब आणि ए. के. स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने “व्हॉइस ओव्हर आणि कार्टून, फिल्म डबिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तुम्हाला कुठेही घराबाहेर न पडता घरच्या घरी ह्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. ही कार्यशाळा ऑनलाईन असल्याने फक्त पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रभरातील सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळा, रविवार,दिनांक 21 नोव्हेंबर  2021 रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत Zoom application वर आयोजित करण्यात आलेली आहे.  या कार्यशाळेला प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच अनेक ऑडीओ बुक्स त्याचप्रमाणे ए के स्टुडीओचे संचालक श्री. केदार आठवले, जे गेली १५ वर्षे  व्हॉईस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत हे व्हॉईस कल्चर, व्हॉईस मॉड्युलेशन, व्हॉईस ओव्हर टेक्निक्स इत्यादीसाठी गरजेची असणारी तंत्र याची माहिती देतील आणि प्रात्यक्षिकांसह  मार्गदर्शन करतील. तसेच सर्व वयोगटातील लोकांसाठी ए के स्टुडीओ, पुणे आणि महाराष्ट्र टाईम्स यांच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते श्री विक्रम गोखले, श्री संदीप खरे आणि श्री केदार आठवले ,या तीनही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली Online तसेच प्रत्यक्ष (In- House) प्रशिक्षण वर्ग लवकरच सुरु होत आहेत. या प्रशिक्षण वर्गानंतर ए के स्टुडीओच्या पाच शाखांमार्फत विद्यार्थ्यांना  जास्तीत जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या शहरातील इतर स्टुडिओमध्ये काम मिळवण्यासाठी व्हॉईस डेमो सीडीमार्फत सर्व प्रकारचे मार्गदर्शनही  करण्यात येईल. तसेच ह्या pandemic काळात घरबसल्या Home Recording Setup तयार करून ,Recording करून, अर्थार्जन करण्यासाठी देखील प्रशिक्षण दिले जाईल.   ही ऑनलाईन कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून प्रवेश मर्यादित आहेत.मात्र त्यासाठी पूर्व नावनोंदणी अत्यावश्यक आहे. त्यासाठी +९१ ९८२२८ ६७४४८ ह्या क्रमांकावर सकाळी ९ ते सायं.७ ह्या वेळेत संर्पक साधून आपले नाव नोदंवावे.

Similar Experiences
Learn to make different types of Samosas
2022-01-28
Zoom Webinar
Know More >
MTCC Masterclass with Saniya Patankar
2022-02-03
Zoom Webinar
Know More >
FB Live
2022-01-20
Know More >