Trek and Camping at Harishchandragad

दूरवर पसरलेली ढगांची चादर, त्यात ताठ मानेने उभे असलेले सह्याद्रीतील अभेद्य सुळके, महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट ‘कळसुबाई शिखर’, सभोवतालचं अभयारण्य, आदी डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा पहायचा, तर या पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाला भेट द्यायला हवीच. आणि हीच संधी खास महाराष्ट्र टाईम्सच्या वाचकांना मिळावी म्हणून ‘सिटी नेक्स्ट डोअर’ या संस्थेने ६ आणि ७ जुलै रोजी ‘हरिश्चंद्रगड ट्रेक आणि कॅम्पिंग’चे आयोजन केले आहे. महाराष्ट्र टाईम्स कल्चरल क्लब या ट्रेकचे कल्चरल पार्टनर आहेत. छानशा ट्रेक सोबत हरिश्चंद्रगडावर कॅम्पिंगची मजाही तुम्हाला या वेळी अनुभवता येईल. हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन मंदिर, केदारेश्वराची गुंफा, काळू नदीचे उगमस्थान, भव्य कोकणकडा, इत्यादी गडावरील ठिकाणांना भेट देत तिथला इतिहास उलगडणारा हा ट्रेक अनुभवायचा असेल, तर आजच आपले नाव नोंदवा. अधिक माहितीसाठी 8433888847/9167711649 या क्रमांकावर संपर्क करा.