Shahanya Mansachi Factory

सलील कुलकर्णी आणि मित्रपरिवार सादर करीत आहेत , कविता,गाणी, अभिवाचन आणि नाट्यानुभव ... चेहऱ्यावर हसू ठेवत ... अंतर्मुख करणारा अनुभव ... शहाण्या माणसांची फॅक्टरी . एक बहुरंगी संध्याकाळ . कविता ..गाणी ..गप्पा ... अभिवाचन आणि नाट्यानुभव सुद्धा .. एक बहुरंगी ..बहुढंगी अनुभव ... शहाण्या माणसांची फॅक्टरी ह्या संगीतकार , गायक व लेखक सलील कुलकर्णी ह्यांच्या नवीन पुस्तकाच्या निमित्तानी सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा कार्येक्रम सादर होत आहे . यात विविध विषयांवरचे लेख असले तरी ह्यात एक समान धागा आहे तो म्हणजे त्वचेच्या आतलं माणूसपण शोधण्याचा .सलीलचा हा शोध वाचकांना आणि सादरीकरणाच्यावेळी रसिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवतो आणि आपल्याला अंतर्मुखही करतो . एखादा मूलभूत पण खोल विचार एखाद्या वाक्यातून सहज मांडण्याची खासियत आपल्याला पुस्तकभर जाणवते . अनेक लेखांमध्ये सलीलने निवडलेला फॉर्म हा गोष्टीचा आहे आणि त्यातली पात्रं आपल्याला आपल्या आसपासची वाटत राहतात .. आजूबाजूच्या घटना ,व्यक्ती आणि वृत्ती यातल्या विसंगतीवर यावर भाष्य करता करता खूप काही देणारा हा कार्यक्रम आहे . यातली प्रत्येक ओळ वाचतांना `अगदी खरंय ` ही प्रतिक्रिया रसिकांच्या मनांत येणं हेच या पुस्तकाचं खरं यश आहे . २६ जानेवारी रोजी पुण्यात आणि त्यानंतर नाशिक ,डोंबिवली येथे झालेल्या कार्यक्रमांत यातील लेखांवर सादर झालेले नाट्यानुभव , यातील लेखांचे अभिवाचन आणि सलील कुलकर्णी ह्यांनी केलेले वाचन ह्या सगळ्यालाच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रसिकांनी भरभरून दाद दिली . वरवर कदाचित तुमच्या चेहऱ्यावर हसू येईलसुद्धा पण त्यापलीकडे जाऊन सलीलला काय म्हणायचंय , काय सांगायचंय ह्याच्याकडे लक्ष द्या , त्यात खूप काही अंतर्मुख करणारं आहे " अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट ह्यांनी याप्रसंगी व्यक्त केली . एक चौफेर अनुभव देणारा हा कार्यक्रम आहे . Free entry and open to all. Preferential seating arrangement for MT Culture Club members. Photo opportunity for all MT Culture Club members with Salil Kulkarni. Contact number for inquiry: 9167711649, 9673670838 (Between 10 am to 7 pm) Program details: Date: Sunday, 19th February Timing: 5:30 pm to 8 pm Venue: Maharashtra Seva Sangh, Near Apna Bazaar, Jawaharlal Nehru Road, Mulund West, Mumbai.