Prayogik Natyamahotsav

मराठी रंगभूमीवर नवीन कलाकारांची पिढी निर्माण व्हावी ह्य्साठी आपण घेतलेला वसा अजुन थोडा पुढे नेण्यासाठी दि. ३ जुन २०१९ रोजीशिवाजी मंदिर येथे पुर्ण दिवस प्रायोगिक नाट्यमहोत्सवा आयोजित केला आहे. सदर महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी त्याठिकाणी सादर होणार्या नाटकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे ह्या उद्देशाने हा महोत्सव आम्ही सुरु केलेला आहे. ह्या महोत्सवाचे उद्धाटन पद्मश्री प्रा.श्री. वामन केंद्रे ह्यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. ह्यावर्षी ह्या महोत्सवात सादर होणारे नाट्यप्रयोग पुढीलप्रमाणे - 1. माझगाव डॉक कलाकार मांडली, संजीवनी सांस्कृतिक मंच निर्मित - "मिशन ५९" 2. हंस संगीत नाटक मंडळी, फोंडा, गोवा - "अव्याहत" 3. अभिषेक कलामंच प्रस्तुत, माध्यम कलामंच मुंबई निर्मित - "खगानिग्रह" For more details call on 9167711649. (11am to 7pm)