One-pot meal soup

सगळीकडेच छान पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे आणि या वातावरणात तुम्हाला शिकायला मिळणार आहेत काही चमचमीत, हेल्दी अशी वन पॉट मिल सूप जी तुमच्या रात्रीच्या जेवणाला एक उत्तम पर्याय ठरू शकतात! या वेळी आम्ही घेवून येत आहोत एक खास कार्यशाळा ज्यात शेफ. पल्लवी नेने ( फाउनडर ऑफ कुकिंग मंत्रा अकॅडमी अँड एक्सपेरीएन्सड प्रोफेशनल किचन ट्रेनर ) आपल्याला शिकवणार आहेत काही पटकन बनणाऱ्या वन पॉट मिल सूप रेसिपीज ज्या चविष्ट तर असतीलच पण न्युट्रीशीयस देखील असतील. या रेसिपी शिकून तुम्हाला रोज रात्री काय बनवायचे हा प्रश्न देखील अगदी चटकन सोडवता येईल. कोणताही खाद्य रंग किंवा अतिरिक्त सॉस याचा वापर न करता, हेल्दी आणि निरनिराळ्या प्रकाराची पारंपरिक तेल वापरून आपण ही सूप अधिक पौष्टीक कशी बनवू शकतो याची माहिती आणि मार्गदर्शन देखील तुम्हाला यात दिले जाईल. तसेच शरीराला अत्यंत उपयुक्त असे स्टॉक वॉटर कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. आपण यात शिकाल व्हेजिटेबल स्टॉक वॉटर मेकिंग पिझ्झा सूप विथ गार्लीक ब्रेड स्टिक क्विक मॅनचाव अँड नूडल्स सूप एक्ससोटिक पास्ता सूप बाऊल राइस अँड पेपर सूप बॉल