Natya Vividha – Prathamesh laghate

गेले संपूर्ण वर्ष अनेक कारणांनी वारंवार मराठी संगीत नाट्य सृष्टीची स्मृती जपणारे ठरले. मास्टर अनंत दामले आणि त्यानंतर गोविंद बल्लाळ देवलांच्या संगीत संशयकल्लोळ च्या शताब्दी वर्षाने सुरु झालेले हे शताब्दीपर्व मग पं. जयराम शिलेदार, नाट्यगीत गायिका इंदिराबाई खाडिलकर आणि संगीत स्वयंवर चे शताब्दी वर्ष अशा स्वरूपात गाजत राहिले. संगीत नाटक म्हटले की ऑर्गनचे सूर आणि तो धूपाचा दरवळणारा गंध मनात रुंजी घालू लागतो आणि अनेक नाट्य पदे मनात फेर धरून जुन्या आठवणीना उजाळा देतात. याच समृद्ध आठवणीना अधिक लखलखीत करण्यासाठी कलांगण सहर्ष सादर करीत आहे नाट्यसंगीताचा एक आगळा वेगळा कार्यक्रम “नाट्यविविधा” ! संगीतकार वर्षा भावे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम आहे नाट्यसंगीताचाच, परंतु संगीत नाटकातील नांदी ते भरतवाक्य यांच्या दरम्यान पसरलेल्या महासागरातील काही सुरम्य निवडक गीतांच्या सादरीकरणाचा ! संगीत नाटकातून जे विविध गीतप्रकार गायले गेले त्यांचा संगीत - नाट्यमय दृक्श्राव्य कार्यक्रम म्हणजे “नाट्यविविधा”! हा कार्यक्रम दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर पश्चिम येथे होणार असून प्रवेशिका सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान स्मारकातील कलांगण च्या ऑफिस मध्ये उपलब्ध आहेत. या कार्यक्रमात आपल्या सुरांनी रंग भरणार आहेत प्रथमेश लघाटे, श्रीरंग भावे, केतकी भावे-जोशी, अवंती पटेल, आदिती आमोणकर आणि वर्षा भावे. वादक आहेत मकरंद कुंडले, श्रुती भावे, धनंजय पुराणिक, विजय जाधव. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहेत अभिनेत्री सीमा देशमुख आणि डॉ. अनिता पटेल. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र टाईम्स चे माध्यम प्रायोजकत्व लाभले आहे. चुकवू नये असा हा विशेष कार्यक्रम! Ticket price for MTCC Members - Become a member and attend the event for free Ticket price for non-MTCC Members - Rs. 250, Rs,200 and Rs.100 To register for this event, please call on 9167711649. No. of seats available - 450 First come, first serve basis