.

‘आता घेऊ ध्यास MH CET चा’ अकरावी आणि बारावी सायन्स निवडलेल्या मुलांचा कल इंजिनिअरिंग, मेडिसीन, आर्किटेक्चर किंवा डिझायनिंग असा शक्यतो असतो. त्यात सुद्धा इंजीनियरिंगकडे ओढा जास्त असतो. इंजिनिअरिंगचा विचार करत असताना प्रामुख्याने काही महत्वाच्या प्रवेश परीक्षा आहेत उदा. JEE Advanced, JEE Main, MHT-CET, PERA CET, KIIT, VITEEE, Manipal, BITSAT, SRM वगैरे. पालक आणि मुलांसमोर हा संभ्रम असतो की यापैकी कुठल्या परीक्षेमुळे कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश होतो? कुठल्या व किती परीक्षा द्याव्यात? त्यांचा Syllabus काय? Format काय? आणि आपल्या पाल्याला या पैकी कुठल्या परीक्षेचा अभ्यास झेपेल. ‘आता घेऊ ध्यास MH CET चा’ हे चर्चासत्र याच मूलभूत गोष्टींची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. डॉक्टर देशपांडे यांनी २००७ पासून, जेव्हा इंजिनिअरिंग साठी सीईटी परीक्षा सुरु झाली, तेव्हापासून याचा सखोल अभ्यास केला आहे व हजारो मुलांना मार्गदर्शन केले आहे. या सेमिनारमध्ये विविध परीक्षेची खालील माहिती दिली जाईल. एक्झाम फॉर्मेट, syllabus पातळी, अभ्यासाची पद्धत आणि लागणारी लेवल याची सखोल माहिती दिली जाईल. MHT-CET परीक्षेमधून कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते, किती व कोणत्या स्ट्रीम्स असतात, कॉलेजेसचे प्लेसमेंट आणि रँकिंग काय आहेत, कॅटेगरीज आणि रिझर्वेशन कसे काम करते. पुण्यातील चांगली इंजिनीरिंग कॉलेजस कुठली आणि त्या मध्ये एडमिशन साठी MH CET मध्ये मार्क किती लागतात. CET चा अभ्यास कसा करावा ? अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय ? फक्त बारावीचा अभ्यास पुरतो का? CET मध्ये चांगल्या मार्कांसाठी पुढील दोन वर्ष अभ्यास कसा करावा, यासाठी हमखास यशाची गुरुकिल्ली आहे का ? 29 मे ला सकाळी 11 वाजता आबासाहेब गरवारे कॉलेज, कर्वे रोड , एरंडवणे पुणे येथे पालकांनी जरूर यावे आणि वरील माहितीच्या आधारे पुढील २ वर्षांची वाटचाल ठरवावी. रजिस्ट्रेशन साठी कॉल करा 9766626033/34/38 किंवा QR Code Scan करा.