MT Helpline

बळ द्या पंखांना...!
‘मटा’ हेल्पलाइन च्या माध्यमातून..
बिकट परिस्थितीशी झुंजत दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळवणाऱ्या, पण पुढील शैक्षणिक वाटचालीत आर्थिक समस्या उभी ठाकलेल्या विद्यार्थ्यांना बळ देणारा ‘महाराष्ट्र टाइम्स’ चा उपक्रम म्हणजे ‘मटा हेल्पलाइन’ या उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष आहे. खडतर परिस्थितीशी झगडून मिळवलेल्या यशाचा आणि या मदतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास आम्ही या उपक्रमाअंतर्गत मांडणार आहोत. या प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असला तरी त्यांच्या डोळ्यांत स्वप्न एकच आहे... शैक्षणिक भरारीचे. हे स्वप्न साकार करण्यासाठी ‘मटा’चे संवेदनशील व सुजाण वाचक या विद्यार्थ्यांच्या पाठीशी गेल्या १२ वर्षांप्रमाणेच यंदाही उभे राहतील, ही खात्री आहेच. याआधीही अनेक विद्यार्थ्यांना मटा हेल्पलाईन च्या माध्यमातून राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या नागरिकांनीही मदत केली आहे.. अनेक विद्यार्थ्यांना यामुळे उच्च शिक्षण मिळाले आहे.. समाजातील सर्व स्तरांतील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे आता ह्या उपक्रमाला एका विधायक चळवळीचे रूप आले आहे.
९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवूनही केवळ विपरीत आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाची वाट खुंटण्याची भीती असलेल्या या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण मार्गी लागावे, या हेतूने त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन यंदाही मटा हेल्पलाईन च्या माध्यमातून करण्यात आले आहे. दर वर्षीप्रमाणेच यंदाही या आवाहनाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल, याची खात्री आहे आणि अपेक्षाही!
For more details visit https://mtcultureclub.com/mthelpline/
Similar Experiences