MasterClass with Santosh Ayachit

‘चला, गोष्ट सांगण्यावर बोलूयात’ मटा कल्चर क्लबतर्फे मास्टर क्लास विथ संतोष अयाचित एखादी गोष्ट आपल्याला आवडते तेव्हा त्यातल्या व्यक्तिरेखा लक्षात राहतात,त्या अनुषंगाने प्रसंग! त्यामुळे गोष्ट सांगणारी व्यक्तीही आपल्याला भावते. तुम्हालाही तुमचं व्यक्तिमत्त्व उत्कृष्ट अभिवाचक म्हणून साकारण्याची संधी आता मिळणार आहे. कारण, ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ तर्फे प्रसिध्द लेखक संतोष अयाचित यांचा मास्टरक्लास आयोजित करण्यात आला आहे. त्यातून टीव्ही माध्यमातून गोष्ट कशी सांगायची, याचं तंत्र, पध्दत आणि शैली तुमच्यासमोर उलगडणार आहे. कीर्तन, भारुड, मालिका, वाचन यासह कित्येक शैलींतून गोष्ट सांगता येते. त्यावेळी व्यक्तिरेखा श्रोत्यांसमोर हुबेहुब उभी करणं आणि हळूहळू गोष्टीतील नाट्य मांडणं यालाही विशेष महत्त्व आहे. अनेकदा गोष्ट सांगताना पध्दत चुकल्याने लेखकाचा गाभा श्रोत्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हिरमोड होतो, हेच टाळण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’ तर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन माध्यमातून ही कार्यशाळा होईल. कार्यशाळेत लेखक अयाचित पात्र, प्रसंग, नाट्य, लेखकाची भूमिका, गोष्ट सांगण्याची पध्दत, मूळ भाषा आणि शैली याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
- कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
- एका सहभागार्थीला अयाचित यांच्याकडे इंटर्नशिप करण्याचीही संधी मिळणार आहे.
- त्यामुळे अभिवाचक आणि लेखक म्हणून करिअरची महत्त्वाची पायरी चढण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.