Masterclass with Manjusha Patil

शास्त्रीय संगीताचा ‘मास्टरक्लास'
पशास्त्रीय संगीत प्रकारातील राग-रागिण्या, ठुमरी, अभंग, नाट्यसंगीत असे प्रकार कसे सादर करावेत, सादरीकरणात कोणते बारकावे आणावेत, त्यातील स्वर, ताल, लय कशी साधावी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे संगीत साधक आणि रसिकांना ‘मास्टरक्लास'मधून मिळणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स'च्या ‘कल्चर क्लब'तर्फे या ‘मास्टरक्लास'चे आयोजन करण्यात आले आहे. २९ ते ३१ जुलै दरम्यान सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत पत्रकार भवन येथे होणाऱ्या कार्यशाळेत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. शास्त्रीय संगीताप्रमाणेच ठुमरी, अभंग, नाट्यसंगीत असे उपशास्त्रीय संगीतातील गायन प्रकार प्रसिद्ध आहेत. हे प्रकार सादर करण्यासाठी सूर-तालाचा अभ्यास असणे गरजेचे आहे. हा अभ्यास कसा करावा, हे गायन प्रकार सादर करण्यासाठी रियाजाची पद्धत कशी असावी, यासंदर्भात तीन दिवस सखोल मार्गदर्शन मंजुषा पाटील करणार आहेत. याशिवाय प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करून गायन प्रकार विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवले जातील. उपशास्त्रीय संगीताच्या सादरीकरणातील बारकावे पाटील उलगडणार असल्याने अधिकाधिक संगीत प्रेमींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मटा कल्चर क्लब'तर्फे करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सशुल्क असून, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असणार आहे. संतोष पॊतदार या कार्यशाळेचे सहयोजक आहेत. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ‘कल्चर क्लब'चे सभासद आणि इतर नागरिकांनी ८३२९६११७३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Similar Experiences