Mann Anand Chayo | MT Culture Club

Mann Anand Chayo

Date :Sun June 26, 2022 Time :05:30 pm
Sun June 26, 2022
05:30 pm

MTCC Members will get 2 passes free Tickets are available at the Maharashtra Times office, FC Road, Pune 11 pm to 5 pm माणसाच्या संवेदनशील मनाला मध्यवर्ती ठेवून लिहिली गेलेली अजरामर अशी हिंदी - मराठी गीते ऐकण्याचा योग पुणेकर रसिकांना मिळणार आहे. *वृषस्वर प्रस्तुत ... मन आनंद छायो*  या सांगीतिक कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या 26 जून रविवार रोजी सायं. 5.30 वाजता MES सभागृह ,कोथरूड येथे संपन्न होतो आहे.   कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना व दिग्दर्शन गायिका वृषाली मावळंकर यांची असून गायक अभिषेक मारोटकर, केदार परांजपे ,अनय गाडगीळ, नीलेश देशपांडे, अपूर्व द्रविड व अभिजीत भदे हे नामवंत कलाकार यात सहभागी होत आहेत. सुप्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले रसिकांशी संवाद साधणार आहे.   वृषाली मावळंकर हया पंधरा वर्षांहून अधिक काळ यशस्वी व्यावसायिक गायिका म्हणून पुण्यात आणि पुण्याबाहेर कार्यरत आहेत. वृषाली यांचे शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण गुरु डॉ. माधुरी डोंगरे यांच्याकडे झाले असून गेली अनेक काही वर्षे गुरु पंडित विजय कोपरकर यांचेही मार्गदर्शन त्यांना मिळत आहे.वृषस्वर या नावाअंतर्गत अनेक उत्तम वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित हिंदी - मराठी गीतांचे रंगमंचीय सादरीकरण त्या सातत्याने रसिकांसमोर करत असतात. *मधुबाला...कुछ हसीन सुरीली यादे* तसेच *स्वराशा,* *माझिया मना* , *चांदण्यात फिरताना* आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांचा... *हृदयस्पर्शी* अशा अनेक संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांच्या यशस्वी प्रयोगांनंतर 26 जून ला संपन्न होणाऱ्या *मन आनंद छायो* या कार्यक्रमाच्या निमित्ताने *वृषस्वर* च्या माध्यमातून एक नवी कोरी संकल्पना घेऊन त्या रसिकांसमोर येत आहेत. मानवी मनाच्या अनेक पैलूंचा- रंगछटांचा हा सुरेल संगीतमय प्रवास पुणेकर रसिकांसाठी निश्चितच मेजवानी ठरणार आहे.  

Similar Experiences