Tribute to Lataji

स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल गाण्यांची मैफल
लता मंगेशकर... ही सात अक्षरंही सप्तसूर वाटावेत, इतकं सांगीतिक सामर्थ्य या नावात आहे. त्याचं वर्णन करताना कितीही विशेषणं लावली, तरी अपुरीच पडतील. अशा वेळी शांतपणे हात जोडावेत आणि या सामर्थ्याला वंदन करावे. नेमक्या याच भावनेने लता मंगेशकर यांच्या स्मृतींना गानवंदना देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे...
लता
एक आठवणस्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी गीतांची ही विशेष मैफल, त्यांना आठवण्यासाठी... त्यांचे सूर पुन्हा हृदयात साठवण्यासाठी...!
संकल्पना आणि विशेष सहभाग : संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी
संहिता : सुलभा तेरणीकर
गायक कलाकार : प्राजक्ता रानडे, शरयू दाते, मधुरा दातार आणि हृषीकेश रानडे
वाद्यवृंद संयोजन : केदार परांजपे
तारीख : २५ फेब्रुवारी
वेळ : सायंकाळी ५
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता
Similar Experiences