Insights on Forts of Mumbai

मटा कल्चर क्लब, साठ्ये कॉलेजचा प्राचीन भारतीय संस्कृती विभाग आणि प्रदाय हेरिटेज तर्फे रविवार दिनांक १९ मे रोजी साठ्ये कॉलेज, पार्ले (पूर्व) येथे दुपारी ४.०० ते ६.३० या वेळात दुर्ग अभ्यासक डॉ. मिलिंद पराडकर यांचे 'मुंबईतील किल्ले' या विषयावरील परिसंवाद आयोजित केला आहे. भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात प्रसिद्धीस असलेल्या मुंबईत सात वेगवेगळी बेटं असताना येथील स्थानिक राजांनी आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी व्यापारासाठी मोक्याची जागा म्हणून या बेटांचा उपयोग करून घेतला. त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वर्चस्व स्थापन केले आणि ते टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या लहान मोठ्या किल्ल्यांची साखळी मुंबईच्या बेटांवर तयार करून अधिक सुरक्षित केले. For more details call on 9167711649. (11am to 7pm)