Healthy Rasmalai and Angoor Basundi Making

घरच्या घरी बनवा लुसलुशीत रसमलाई
हेल्दी रसमलाई अँड अंगूर बासुंदी मेकिंग
मस्त लुसलुशीत रसमलाई खायला सगळ्यांनाच खूप आवडते, पण हलवाया कडे गेलो की त्याच्या अवच्या सावा किंमती आपल्याला मोजाव्या लागतात. तसेच यात असतात हानिकारक खाद्य रंग आणि मिश्र दुग्ध पदार्थ.
पण आता अतिशय हेल्दी असे साहित्य वापरून हलवाई स्टाइल ने हीच रसमलाई आपल्याला घरी बनवता आली तर? आवडेल ना?
मग चला तर, जॉईन करा आमची रसमलाई मेकिंग कार्यशाळा!
तसेच हा कोर्स केल्यानंतर कॅटरिंग आणि स्मॉल फूड बिझनेस करणारे लोक देखील आपल्या मेनू मधे काही खास नाविण्यपूर्णता आणू शकतील.
या कोर्स मध्ये आपण दुधापासून पासून रसमलाई बनवायची पद्धत स्टेप बाय स्टेप शिकाल. तसेच सणासुदीला बनवण्यासाठी स्पेशल रसमलाई चे खालील विशेष आणि निरनिराळे प्रकार देखील शिकाल.
- मिल्क / बासुंदी फॉर रसमलाई
- ओरिजनल रसमलाई
- बेसिक रसमलाई बॉल्स + अंगूर मलई
- ड्राय फ्रूट अंगुर बासुंदी / अंगूर मलई
- रोझ गुलकंद रसमलाई
- संदेश (बंगाली मिठाई)
ऑनलाईन कार्यशाळा झूमवर घेतली जाईल.
आपल्याला या कार्यशाळेत शिकवल्या जाणाऱ्या सर्व रेसिपीज PDF फाईल मार्फत डिटेल नोट्स मध्ये दिल्या जातील