Flea Market

समस्त पुणेकरांसाठी पुन्हा प्री कोविड चे सुगीचे दिवस आले आहेत. याचेच औचित्य साधून अलाईव्ह एक्सपीरियन्स यांनी मनोहर मंगल कार्यालय येथे ५ आणि ६ मार्च असे दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे मटा कल्चर क्लब हे कल्चरल पार्टनर आहेत. कोरोना महामारी नंतर प्रथमच इतक्या भव्य प्रमाणात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधने, घर-उपोयोगी वस्तू, विविध प्रकारच्या साड्या, दागिने एवढेच नाही तर खवय्ये मंडळींचा विचार करून अनेक चविष्ट, चमचमीत पदार्थ ठेवण्यात येणार आहेत. अलाईव्ह एक्सपीरियन्स ने हे प्रदर्शन कोविड मध्ये ठप्प झालेल्या घरगुती व्यवसायांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना चालना देण्यासाठी आयोजित केले आहे. तर नक्की या आणि प्रदर्शनाचा आनंद लुटा. तारीख :- ०५ मार्च व ०६ मार्च २०२२ वेळ :- सकाळी १०.०० ते रात्री ९.०० ठिकाण :- मनोहर मंगल कार्यालय