Chinese Combo Platter

मॉन्सून स्पेशल चायनीज पार्टी प्लॅटर
पावसाळी वातावरणात स्मोकी चायनीज पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडते. लहान मुले आणि तरुणाईचा तर हा खास आवडता मेन्यू. आता हे पदार्थ बाहेर खायचे म्हटले की ‘हायजिन', ‘क्वालिटी' आणि त्यासाठी आकारली जाणारी किंमत आपल्याला थोडा विचार करायला लावते. त्यामुळेच ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' आणि कुकिंग मंत्रा अॅकॅडमीच्या संस्थापक शेफ पल्लवी नेने यांनी ‘मॉन्सून स्पेशल चायनीज पार्टी प्लॅटर' कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये घरच्या घरी चायनीज प्लॅटर बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. येत्या शुक्रवारी (२२ जुलै) दुपारी तीन वाजता ‘झूम'द्वारे ऑनलाइन पद्धतीने ही कार्यशाळा पार पडणार आहे. साधारणपणे आपण घरी फ्राइड राइस, हक्का नूडल्स आणि मंच्युरियन बनवतो. मात्र, घरी नेहमी हे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल, तर या कार्यशाळेत रेस्टॉरंट स्टाइल चमचमीत चायनीज प्लॅटर मेन्यू तयार करायला शिकता येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांना ‘रेसिपी नोट्स'ची ‘पीडीएफ' फाइल ‘व्हॉट्सॲप'मार्फत पाठवल्या जाणार आहेत.
Similar Experiences