Atala Kappa

निसर्गाच्या कुशीतून संदीप खरे यांची मैफिल! एलान एंटरटेन्मेंटस एक वेगळी आणि नवीन संकल्पना काव्यप्रेमींसाठी घेऊन येत आहे ऑनलाईन डेस्टिनेशन कॉन्सर्ट. कोरोना महामारीत कलाकार रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी ऑनलाईन मैफिली सादर करीत असताना संदीप खरे यांची 'आतला कप्पा' ही मैफिल थेट निसर्गाच्या कुशीतून रसिकांसाठी सादर होणार आहे. स्टुडिओ च्या बाहेर जाऊन थेट निसर्गामधून अतिशय देखणे असे चित्रीकरण या मैफिलीचे गप्पांगण कृषी पर्यटन केंद्र, पुणे येथे झालेले आहे. संदीप खरे यांच्या बहारदार कवितांनी आणि RJ शोनाली च्या गप्पांनी ही मैफिल सजणार आहे 19 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता. आपापल्या घरात बसून आपल्या कुटुंबासोबत संदीप खरे यांची ऑनलाईन मैफिल पाहण्याचा लाभ रसिकांनी जरूर घ्यावा असे आवाहन एलान एंटरटेन्मेंटस तर्फे करण्यात आले आहे. या मैफिलीची संकल्पना आणि दिग्दर्शन प्रथमेश इनामदार यांचे आहे. महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब या मैफिलीचे कल्चरल पार्टनर आहेत. या मैफिलीत संदीप खरे सादर करतील तुमच्या मनातील आवडीच्या कवितांसोबतच काही नवीन कविता. निसर्गाच्या सानिध्यातून, हिरव्यागार डोंगररांगांमधून संदीप च्या कवितांचा ऑनलाईन आस्वाद घेण्यासाठी फॅमिली तिकीट बुक करा www.connectelan.com या संकेतस्थळावर. बुकींग साठी काही अडचण आल्यास 8411818395 या क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यक्रम बघण्यासाठी इ-मेल आयडी असणे आवश्यक आहे.