Aatmavishwas Ani Yashachi Gurukilli

आत्मविशास आणि यशाची गुरुकिल्ली आपण आपल्या आयुष्यात अनेक संकल्प करण्याचा तसेच चांगल्या सवयी लावण्याचा निश्चय मनाशी करत असतो. मग त्यात सकाळी लवकर उठून योगधारणा करणं असो किंवा मनातली भीती दूर करणे असो, या आणि अश्या अनेक गोष्टी काही कारणास्तव करता येत नसल्यामुळे आपल्यातील आत्मविश्वास कमी होतो, काहीतरी नवं करण्याची इच्छाच राहत नाही. तसेच आयुष्याच्या वळणावर आपण अनेक वाईट प्रसंगांचा देखील सामना केलेला असतो आणि त्या कटू आठवणी मनातून पुसता येत नाही. काही गोष्टींची सतत भीती सुद्धा वाटत असते,ती भीतीही नाहीशी करता येत नाही. परंतु, आता काळजी करण्याचं काही कारण नाही. या सर्व गोष्टी वैज्ञानिक पद्धतीने कश्या बदलता येतील यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि मास्टरींग माईंड यांच्या संयुक्त विद्यमाने "न्यूरो लँग्वेस्टिक प्रोग्रामिंग - एक चमत्कार" या विशेष सत्राचे दुसऱ्यांदा खास आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या माध्यमातून तुम्हाला गेल्या ३ वर्षांपासून 'न्यूरो लँग्वेस्टिक प्रोग्रामिंग आणि सबकौंशियस इंस्टॉलेशन्स' या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'अर्चना मुजुमदार' या तुमच्याशी संवाद साधतील. NLP('न्यूरो लँग्वेस्टिक प्रोग्रामिंग) च्या प्रक्रिये मध्ये तुमच्या कटू आठवणी पुसल्यावर , त्या आठवणीतील तुमची ती भावना, दुःख पूर्णपणे निघून गेले असेल , त्या कडे तुम्ही स्थितप्रज्ञ पद्धतीने बघू शकाल . एखाद्याला उंचीची भीती असते, NLP ('न्यूरो लँग्वेस्टिक प्रोग्रामिंग) च्य्या प्रक्रिये नंतर त्याची ती भीती नेहमी साठी निघून जाईल , एव्हढेच नाही तर त्या भीतीपोटी तुम्ही आत्ता पर्यंत जे निर्णय घेतले असतील ते ही बदलतील , जसं तुम्ही वरच्या मजल्यावर घरात राहू शकाल , विमानात न घाबरत बसू शकाल,ट्रेकिंगला जाऊ शकाल . या सर्वांनी तुमच्या प्रगतीचा वेग अनेक पटीने वाढेल . एखाद्याच्या नाते संबध सुधारण्यासाठी ही प्रक्रिया केली , तर ते नाते तर छान होईलच , त्या बरोबर व्यावसायिक , कौटुंबिक , किंवा सामाजिक नात्यांमध्ये खूप चांगला बदल येईल . याला इंटिग्रेटेड ग्रोथ म्हणतात . या सत्राच्या मार्गदर्शिका अर्चना मुजुमदार यांनी या विषयाशी संबंधित अनेक कार्यशाळा घेतल्या असून त्या गेल्या १२ वर्षांपासून समुपदेशिका म्हणून सुद्धा कार्यरत आहेत व २०१२ पासुन आयसाब(ISAB) प्रमाणित कोच आहेत .अर्चना मुजुमदार यांनी या क्षेत्रात सुपर मास्टर केलं आहे, त्याव्यतिरिक गेल्या १८ वर्षांपासून गायिका सुद्धा आहेत. लहान मुलानांपासून ते वृद्ध या वयोगातील सर्व या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतील. लहान मुलांच्या अभ्यासाची किंवा परीक्षेची भीती हि त्यांच्या मनातून कायमस्वरूपी घालवण्यासाठी व वाढत्या वयानुसार येणारी निराशा आणि त्यासोबतच होणारे आजार या सगळ्या गोष्टीपासून हे शाश्त्र दूर ठेवण्यास मदत करत. तसेच तरुणांना त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातला आत्मविश्वास आणि ग्रोव्हथ होण्यासाठी मदत होते. प्रवेश शुल्क:- मटा कल्चर क्लब सभासद :- १२००/- रुपये . सभासद नसलेले :- १५००/- रुपये . या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी mtcultureclub.com या वेबसाईट ला भेट द्या किंवा ९८२०८८६४२८ / ७७१५८७४०७९ या क्रमांकावर संपर्क करा कधी:- १,२आणि ३ ऑक्टोबर Wel-१ऑक्टबर , शुक्रवार ७-८ संध्याकाळ . २आणि ३ ऑक्टोबर ४-५ संध्याकाळ .