Masterclass

चांगले स्वर नेहमीच मनाचा ठाव घेतात आणि ते जर एखाद्या निष्णात गायकाने गायलेले असतील तर मग विचारच करायला नको.. आणि अशाच निष्णात गायकाकडून अभिजात कला शिकण्याची संधी मिळाली तर.. ? महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब ही संधी तुम्हाला उपलब्ध करून देतोय.. मास्टर क्लास विथ पंडित शौनक अभिषेकी या वेबिनार मार्फत.. आपल्याला चांगला गुरु लाभावा असे शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते.. मात्र काही कारणास्तव हे स्वप्न अनेकांना पूर्ण करता येत नाही.. हीच संधी या ऑनलाइन झूम वेबिनार च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन वेबिनार असल्याने तुम्ही कुठेही असा तुम्हाला या वेबिनार मध्ये सहभागी होता येईल.. दिनांक ७ जुलै ते १० जुलै संध्याकाळी ५ वाजता हा मास्टर क्लास असणार आहे.या झूम वेबिनार च्या माध्यमातून तुम्हाला शास्त्रीय संगीतातला एखाद्या रागाचा विस्तार , बंदिश, आणि या रागावर आधारित , भावगीत, भजन , अभंग, नाट्यसंगीत यापैकी कुठल्यातरी एका प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल.. त्याचप्रमाणे यानिमित्ताने तुम्हाला यासंदर्भातले काही प्रश्न असतील तर तेही प्रश्न यावेळी पंडितजींना विचारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्वर ज्ञान असणे आवश्यक आहे.. यासाठी वयाची अट नाही..महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि संतोष पोतद्दार इव्हेंट्स यांनी या मास्टर क्लास वेबिनारचे आयोजन केले आहे..