स्वरताल

नादब्रम्ह क्रिएशन्स आणि विविक्त एंटरटेनर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने ठाणेकरांना एक मंत्रमुग्ध करणारी संध्याकाळ अनुभवायला मिळणार आहे. ८ डिसेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता ठाण्यात स्वरताल हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये राहुल देशपांडे , शौनक अभिषेकी आणि उस्ताद झाकिर हुसैन यांचे सादरीकरण अनुभवायला मिळणार आहे. म.टा.कल्चर क्लब ठाणे या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहे. यंदाचे वर्ष हे उस्ताद अल्लारखा यांचे उत्तर जन्मशताब्दीवर्ष आहे आणि डॉ वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने ही मैफल आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसंतराव देशपांडे आणि जितेंद्र अभिषेकी यांच्या कलाकृती रसिकांसमोर उलगडण्यात येणार आहेत. यावेळी त्यांचा वारसा पुढे नेणारे राहुल देशपांडे आणि शौनक अभिषेकी आपल्या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध करतील तर पंजाब घराण्याचे खलिफा झाकिर हुसैन त्यांना साथ करणार आहेत. तर मिलिंद कुलकर्णी संवादिनी साथ करणार आहेत. ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालय येथे ही मैफल रंगणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका गडकरी रंगायतन आणि BookMyShow येथे उपलब्ध आहेत. म.टा.कल्चर क्लबच्या सदस्यांना आपले मेम्बरशिप चे कार्ड दाखवल्यास तिकिटांवर २०% सूट आहे. अधिक माहितीसाठी कृपया ९८२१८९८२२० या क्रमांकावर फोन करावे. म.टा. कल्चर क्लब चे रु. ४९९/- चे वार्षिक सदस्यत्व घेऊन या कार्यक्रमात सहभागी होता येईल. सदस्यस्तव मिळवण्यासाठी www.mtcultureclub.com/register वेबसाईट वर जाऊन आजच आपले नाव रजिस्टर करा.