सफर दुर्गदुर्गेश्वर रायगडाची

स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेला ‘रायगड’ आपल्या भव्यतेची, अभेद्यतेची साक्ष देत सह्याद्रीच्या कुशीत आजही ताठ मानेने उभा आहे. शेकडो वर्षांचा इतिहास जवळून पाहीलेल्या या दुर्गदुर्गेश्वर रायगडला भेट देण्याची संधी महाराष्ट्र टाईम्सच्या वाचकांना मिळावी, म्हणून महाराष्ट्र टाईम्स कल्चरल क्लब ने २० आणि २१ जुलै रोजी ‘सफर दुर्गदुर्गेश्वर रायगडाची’ या ट्रेकचे आयोजन केले आहे.किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक स्थान, स्थापत्यशास्त्रीय दृशिकोन,आदी अंगानी किल्ल्याची ओळख या ट्रेकमध्ये करून देण्यात येईल. अधिक माहितीसाठी 9167711649/9673670838 या क्रमांकावर संपर्क साधा.