Psychological Consultation

मानसशास्त्र ह्या विषया बाबत असलेले गूढ अज्ञान,समोपदेशन म्हणजेच कौन्सेलिंगला जाणे म्हणजे मला वेड तर नाही ना लागलं ? असे गैरसमज दूर करत अभ्यासाचे वातावरण निर्माण करणे.ही काळाची नितांत गरज आहे.ही गरज लक्षात घेऊन संवेदन प्रशिक्षण संस्थेतर्फे समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' ह्या कार्यशाळेचा मिडिया पार्टनर आहे.
येत्या काळात सगळ्यात मोठे क्षेत्र म्हणून उदयाला येणारे क्षेत्र म्हणजे मानसशास्त्र. कारण आपण सगळ्या गोष्टी रोबोकडून करून घेऊ शकू पण कौन्सेलिंग हे माणसाकडूनच करावे लागेल.
ह्या कार्यशाळेत शिकता येतील मानसशास्त्रातील मूलभूत संकल्पना ते सिग्मंड फ्रॉईडने मांडलेल्या मनाच्या अवस्था तसेच "सह-वेदना" व त्या वापराच्या पद्धती.
एक्केचाळीस वर्ष मनोविकारतज्ञ म्हणून मुंबईत कार्यरत असलेले डॉ.राजेंद्र बर्वे सर हे मार्गदर्शक असणार आहेत. मानसशास्त्रीय विषयांवरील लेख तसेच त्यांची ह्या विषयांवर अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. सप्टेंबर महिन्यातील १३,२०,२७ आणि ४ ऑक्टोबर असे चार रविवार सकाळी १० ते १२ लाइव्ह सत्र घेतले जाईल. एक महिनाभर चालणाऱ्या ह्या कार्यशाळेत चार रविवार दोन तासाची लाइव्ह सत्र आणि आपल्याला त्या दरम्यान शिकण्यासाठी अभ्यास साहित्य, आणि व्हिडीओ लिंक्स दिल्या जातील. ज्याचा वापर करून सहभागी असाईनमेंट सोडवतील, डॉ. राजेंद्र बर्वे स्वतः तपासून त्यावर वैयक्तिक मार्गदर्शन करतील.अशा प्रकारे एक महिन्याची ही कार्यशाळा असेल. ज्यात सहभागाचे प्रमाणपत्रही संवेदन तर्फे दिलं जाईल.
For Registration call on 8668336768 / 7715830574
Similar Experiences