गीत लेखन with Shrirang Godbole

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीपासूनच गीत लेखन हा अतिशय महत्वाचा भाग राहिला आहे.आपल्या आवडीच्या सगळ्याचं वस्तू ह्या आपल्यापर्यंत पोहचत आल्या त्या जिंगल्सनी! आज हे क्षेत्र अतिशय गतीने पुढे येते आहे, वाढत्या गरजा, डिजिटल होत जाणारं जग आणि ह्या सगळ्यात आपली मालिका, चित्रपट किंवा अगदी राजकीय पक्ष ही स्मरणात राहावं म्हणून गाण्याचा वापर करताना दिसतात. अश्याच गीत लेखनातील एक अतिशय महत्वाचं नाव म्हणजे श्रीरंग गोडबोले ! चित्रपट गौरव गीत, झी गौरव गीत, घडलंय बिघडलंय अश्या एकापेक्षा एक गाजलेल्या गाण्यांचे गीतकार, तुझ्यात जीव रंगला, नकटीच्या लग्नाला, अग्निहोत्र, एकापेक्षा एक अश्या गाजलेल्या सिरियल्सचे शीर्षक गीत तसेच सध्या गाजत असलेले "इडियट्स" ह्या नाटकाचे लेखक व गीतकार श्रीरंग गोडबोले ह्यांच्या सोबत एक दिवसाची गीतलेखन कार्यशाळा संवेदन ह्या संस्थेने आयोजित केली आहे. या कार्यशाळेत दुपारचे जेवण,चहा,लेखन साहित्य व महत्त्वाच्या मुद्द्यांवरील नोट्स असं प्रत्येक सह्भागीस दिले जाईल. ही कार्यशाळा सौ.नलिनी यशवंतराव दोडे विद्यालय, मुलुंड पूर्व येथे आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी ९१६७७११६४९ या क्रमांकावर कॉल करा.