गदीमायान…. आनंद युगाचा सुरेल मागोवा!

गदिमांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेचे आणि बहुरंगी आयुष्याचे चित्तवेधक प्रतिबिंब..... गदीमायान! गदिमांच्या सदाबहार लेखणीतून उतरलेल्या भावगीतांचा, भक्तिगीतांचा, चित्रपटगीतांचा आणि ढंगदार लावण्यांचा सुंदर गोफ विणत केलेला एक सांगीतिक प्रवास!! आणि तो सुद्धा आनंद माडगूळकरांनी त्यांच्या खास शैलीत सांगितलेले गदिमांचे किस्से, प्रसंग आणि कहाण्यांच्या साथीनं! अजरामर गीत रामायणातील निवडक गीतांचा त्यात समावेश आहेच. कारण त्याशिवाय गदिमांच्या यशाचा .आलेख पूर्णच व्हायचा नाही. खरं तर हा नुसता गाण्यांचा कार्यक्रम नाही, या आहेत गदिमा गीतांनी नटलेल्या गदिमांवरच्या दिलखुलास पोटभर गप्पा! For more details, please call on 9167711649. Working hours - 11am to 7pm (Mon-Sat).