
बाप्पांच्या पूजेची सर्व तयारी आता घरच्या घरी! (फक्त पुणे)
करोना संसर्ग अद्याप शिल्लक असताना आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची गरज संपलेली नसतानाच, पुणेकरांचा लाडका गणेशोत्सव जवळ येतो आहे. ‘खूपच लांबलेल्या या करोनाच्या संकटातून सोडव,’ अशी श्रीगजाननाकडे प्रार्थना करायची आहे; शिवाय गणेशाची मूर्ती आणि पूजेची सगळी सामग्री गोळा करून गणेशोत्सव आनंदात साजरा करायचा आहे.त्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ घेऊन आला आहे अभिनव उपक्रम; ज्याच्या अंतर्गत तुम्ही घरबसल्या बाप्पाची मूर्ती आणि पूजा सामग्री ऑर्डर करू शकता.यात आहे खास पेणमध्ये बनलेली शाडू मातीची, श्रीगणेशाची सुंदर पर्यावरणपूरक मूर्ती. सोबत, पूजेसाठी लागणारं सगळं पूजा साहित्य. शिवाय शास्त्रशुद्ध पूजा कशी करायची, याची संपूर्ण माहिती देणारी देखणी पुस्तिका. या पुस्तिकेत आहे गणपतीबाप्पांविषयी खूप रंजक माहिती आणि सगळ्या आरत्याही. तेव्हा आपल्या लाडक्या बाप्पांचं साग्रसंगीत स्वागत आणि यथासांग पूजन करण्यासाठी तुम्हाला कोणावरही अवलंबून रहायची गरज नाही.
हा उपक्रम ‘महाराष्ट्र टाइम्स’ ‘हेरिटेज फर्स्ट’च्या सहकार्याने राबवत आहे.
पुजा सामग्री : हळद, कुंकू, अक्षता, कापूर, वस्त्र, अष्टगंध, वाती, उदबत्ती, रांगोळी, तोरण, आसन, रांगोळी स्टेन्सिल, घंटा, टाळ, उदबत्तीचे घर, निरांजन, सुपारी, यज्ञोपवीत, आरती पुस्तिका, बुक्का आणि गणपतीची मूर्ती (सहा इंची).
बाप्पाची मूर्ती आणि पूजा सामग्री घरबसल्या ऑर्डर करा.
ऑर्डरची डिलिव्हरी ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान मिळेल.


